Obesity In India : २०३५ पर्यंत जगातले अर्धे लोक होणार ‘वजनदार’; पहा काय सांगतोय सर्व्हे

लहान मुले आणि महिलांमध्येही वाढत प्रमाण
Obesity In India
Obesity In India esakal
Updated on

 Obesity In India : जास्त वजन किंवा लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. त्यातून असंख्य आजार होतात. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचा ताज्या अहवालात अशी चेतावणी आहे की जर आपण आपली जीवनशैली, खाण्याच्या सवयी बदलल्या नाहीत तर 2035 पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोक लठ्ठ होतील.

वर्ल्ड ओबेसिटी ऑल्टस 2023 च्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की, जर परिस्थिती अशीच राहिली. तर 2035 पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोक वजन आणि लठ्ठपणाचा सामना करत असतील. हा अहवाल वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनने जारी केला आहे.

अहवाल तयार करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय हा आधार बनवण्यात आला आहे. लठ्ठपणा प्रतिबंध आणि उपचार उपाय सुधारले नाहीत, तर पुढील 12 वर्षांत जगातील सुमारे दोन अब्ज लोक म्हणजे चारपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त असेल.

Obesity In India
Rice for Weight Loss: या पद्धतीने भात शिजवून खाल तर वाढणार नाही वजन

ही एक भयानक समस्या आहे. लठ्ठपणा हा एक आजार आहे. त्यामुळे लठ्ठ व्यक्तीमध्ये कॅन्सर, मधुमेह, हार्मोन्सचे असंतुलन, हृदयविकार यासह अनेक आजार होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर या आजाराचा देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाने याला तोंड देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

जागतिक लठ्ठपणाच्या अहवालानुसार, 2035 पर्यंत देशातील प्रौढांमधील लठ्ठपणात सरासरी वार्षिक वाढ 5.2 टक्के अपेक्षित आहे. तर या कालावधीत मुलांमधील लठ्ठपणात वार्षिक वाढ नऊ टक्क्यांहून अधिक अपेक्षित आहे. ही परिस्थिती सांगत आहे की, देशात जास्त वजन आणि लठ्ठपणाची समस्या गंभीर रूप धारण करत आहे.

तर, 2019 ते 2021 या कालावधीतील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या डेटावरून असे दिसून आले आहे. पुरुषांचे जास्त वजन किंवा लठ्ठपणाचे प्रमाण 2006 मध्ये 9.3 टक्क्यांवरून 2021 मध्ये 22.9 पर्यंत वाढले आहे. तर महिलांची टक्केवारी 12.6 वरून 24 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

भारतीय मुले वाढत्या प्रमाणात बळी पडत आहेत 2020 मध्ये देशातील मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका 3 टक्के होता. तो 2035 पर्यंत 12 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 2 टक्के होती. 2020 मध्ये मुलींमध्ये लठ्ठपणाचा धोका, 2035 पर्यंत सात टक्क्यांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे.

Obesity In India
Weight Loss: कष्टाने कमी केलेलं वजन पुन्हा का वाढतं?

बीएमआय प्रमाण काय आहे?

एखाद्या व्यक्तीची लांबी किलोग्रॅममध्ये आणि त्याचे वजन चौरस मीटरमध्ये या गुणोत्तराला बॉडी मास इंडेक्स म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 25 पेक्षा जास्त बीएमआय स्कोअर जास्त वजन मानला जाते. तर, 30 पेक्षा जास्त स्कोअर लठ्ठ म्हणून वर्गीकृत केला जातो.

भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम जागतिक स्थूलता ऍटलस अहवालानुसार, देशातील जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2035 पर्यंत $129.33 अब्ज डॉलर्सचा फटका बसण्याची शक्यता आहे.अति वजनामुळे देशाच्या जीडीपीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Obesity In India
Rice for Weight Loss: या पद्धतीने भात शिजवून खाल तर वाढणार नाही वजन

2035 पर्यंत 1.8 टक्के लठ्ठपणामुळे, 2035 पर्यंत भारताचा अंदाजे आर्थिक खर्च थेट आरोग्य सेवेसाठी 8.43 अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. अकाली मृत्यूमुळे देशाचे नुकसान $109.38 अब्ज एवढा आहे, तर प्रत्यक्ष गैर-वैद्यकीय खर्च $176.32 दशलक्ष, गमावलेल्या कामामुळे आणि उत्पादकता गमावल्यामुळे $2.23 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. यामुळे 9.10 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वय आणि लठ्ठपणाचा संबंध लठ्ठपणा वाढवण्यात आपले वय महत्त्वाची भूमिका बजावते. 40 ते 49 या वयोगटात लठ्ठपणाची सर्वाधिक वाढ दिसून येते. NFHS 2019-21 च्या अहवालानुसार, 40 ते 49 वयोगटातील 11 टक्के महिला लठ्ठ होत्या, तर त्याच वयोगटातील 5.7 टक्के पुरुष लठ्ठ होते.

Obesity In India
Woman Weight : महिलांचं वजन एवढ्या झपाट्याने का वाढतं माहितीये?

ग्रामीण भागातील लोक कमी लठ्ठ

देशाच्या शहरी भागातील लोक जास्त लठ्ठ आहेत किंवा ग्रामीण भागातील लोकांपेक्षा जास्त वजन. या सर्वेक्षणादरम्यान हेही समोर आले आहे की, शहरी भागातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त वजनाच्या किंवा लठ्ठ असतात, तर ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांमधील हा फरक फारच किरकोळ आहे.

2035 पर्यंत, जगातील निम्मी लोकसंख्या लठ्ठ होतील. वर्ल्ड ओबेसिटी ऍटलस 2023 ने नुकताच 2020 ते 2035 दरम्यान लठ्ठपणात वाढ झाल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. असा अंदाज आहे की 2035 पर्यंत जगातील 51 टक्के लोकसंख्या जास्त वजन किंवा लठ्ठ असेल.सर्वात चिंतेची बाब म्हणजे लठ्ठ मुलांची संख्या सर्वाधिक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.