तुमच्या ड्रेसिंग सेंसवरुन साधारण तुमची पर्सनालिटी कळते. त्यामुळे ऑफिसचे कपडे खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आत्मविश्वास हा तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर तुमचे दिसणे महत्वाचे ठरते. त्यामुळे ऑफिसच्या कपड्यांबाबत तुम्ही अधिक सतर्क असले पाहिजे.
या गोष्टी लक्षात ठेवा
१) ऑफिसमध्ये कॅज्युअल कपडे घालू नका- ऑफिसमधला कॅज्युअल लूक तुमची अनौपचारिक वागणूक दर्शवतो तर प्रोफेशनल लूक तुम्ही करिअरवर बारकाईने लक्ष देताय हे दाखवतो पण, आठवड्यातल्या एका दिवशी असा लूक कॅरी करायला हरकत नाही. पण जर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस कॅज्युअल वेअर्समध्ये ऑफिसला जात असाल तर ते योग्य नाही.
२) आकाराची काळजी घ्या- परफेक्ट फिटिंग आणि कम्फर्ट यांच्यात योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे. चांगल्या फिटींगचे कपडे घातल्याने तुम्ही प्रेझेंटेबल दिसता. तर, खूप घट्ट कपडे घालून तुम्हाला अस्वस्थ वाटते. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा, जे घालून तुम्ही आरामात काम करू शकता.
३) कपड्यांमुळे आत्मविश्वास वाढतो- आत्मविश्वास असणारी माणसे नेहमीच लोकांना आवडतात. त्यामुळे ऑफिससाठी नेहमी असे कपडे निवडा जे परिधान करून तुम्हाला आत्मविश्वास वाटेल, मग ते जीन्स-शर्ट, पंजाबी ड्रेस किंवा साडी असो. रंग किंवा फॅब्रिकमध्ये खास चॉईस असेल तर त्याला प्राधान्य द्या. कारण आत्मविश्वासाचा तुमच्या कामावरही परिणाम होतो.
४) फूटवेअरवरही लक्ष द्या- महिलांचे बहुतांश लक्ष कपड्यांवरच असते. फूटवेअर निवडताना, महिला ब्रँड आणि गुणवत्तेकडे जास्त लक्ष देत नाहीत. कपड्यांप्रमाणेच पादत्राणे व्यक्तीमत्वावर प्रभाव पाडत असतात. एका अभ्यासानुसार, बहुतेक लोक कपड्यांपेक्षा पहिल्यांदा तुमच्या पादत्राणांकडे लक्ष देतात, म्हणून पादत्राणे नीट असावीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.