Omelette Recipe : तूम्ही अंड्याशिवाय बनलेलं ऑमलेट कधी खाल्लय का?

अवघ्या पाच मिनिटात ही पौष्टिक रेसिपी तयार होते
Omelette Recipe
Omelette Recipeesakal
Updated on

 Omelette Recipe :

हेडिंग वाचून जरा दचकलात ना. अंड्याशिवाय ऑमलेट होऊ शकत का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे हो. अंड न घातला तशाच चवीचं ऑमलेट बनवता येतं. याची रेसिपीही एकदम सोपी आहे आणि हे तयारही पटकन होतं.

या स्पेशल ऑमलेटसाठी तुम्हाला बाजारातून अंड्यांऐवजी टोमॅटो आणावे लागणार आहेत.कारण आपण हे ऑमलेट टोमॅटोपासून बनवणार आहोत. टोमॅटोपासून बनलेलं हे ऑमलेट चविला तर बेस्ट आहेच. पण पौष्टिकतेच्या बाबतीतही पुढेच आहे. कारण, यामध्ये तांदूळ अन् बेसनही आपण वापरणार आहोत.

चला तर मग ही पाच मिनिटात होणारी अंडा ऑमलेटची रेसिपी कशी आहे. त्यासाठी काय काय साहीत्य लागेल हे पाहुयात.  (Omelette Recipe)

साहीत्य

  • २ वाट्या डाळीचे पीठ

  • २ टे.स्पून तांदळाची पिठी

  • ५-६ लसूण पाकळ्या

  • ३-४ हिरव्या मिरच्या

  • पाव किलो टोमॅटो बारीक चिरून

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • पाव चमचा हळद

  • आवश्यकतेनुसार मीठ आणि तेल

Omelette Recipe
Rose Lassi Recipe : घरच्या घरी बनवा रोझ लस्सी, कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा! सोपी आहे रेसिपी

कृती

  1. डाळीच्या पिठात तांदळाची पिठी आणि पाव चमचा हळद घालून ठेवावी

  2. मिक्सरमध्ये बारीक केलेला टोमॅटो,लसूण मिरची या पिठात घालून चांगले मिक्स करावे

  3. घुसळलेला टोमॅटो डाळीच्या पिठात घालून रसरशीत भिजवून घ्या, यामध्ये कोथिंबीर घालावी (Healthy Recipe )

  4. गॅसवर तवा ठेऊन त्यावर तेल शिंपडावे

  5. तवा तापला की त्यावर या पिठाचे जाडसर ऑमलेट घालावे

  6. एका बाजून भाजल्यानंतर हळूच परतावे व दोन्ही बाजूने खरपूस भाजावे

  7. तुमचं अंड न घातलेलं ऑमलेट तयार आहे

  8. ऑमलेट तुम्ही चपाती किंवा ब्रेडसोबतही खाऊ शकता.

  9. हे तुम्ही मुलांच्या डब्याला, नाश्त्यासाठी हा पौष्टीक आणि बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Omelette Recipe
Rava Uttapam Recipe : नाश्त्याला बनवा गरमागरम चविष्ट रवा उत्तप्पम, दिवसभर राहील एनर्जी, एकदम सोपी आहे रेसिपी

हे लक्षात ठेवा

डाळीचे पीठ शक्यतो घुसळलेल्या टोमॅटोत भिजवावे. म्हणजे चव आबंटसर लागते. या पिठात तुम्ही अर्धा चमचा जिरे अर्धवट कुटून, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालाव्यात याने अधिक चव येते. (Tomato Omelette Recipe In Marathi)

(ही रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या ‘हमखास पाकसिद्धी’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.