One Nation, One Uniform म्हणजे काय ? पोलिसांचा युनिफॉर्म कोण ठरवतो, वाचा एका क्लिकवर

Explained: सध्या पोलिसांचा युनिफॉर्म खुप चर्चेत आहे
Police Uniform
Police UniformDainik Gomantak
Updated on

पोलिसांचा युनिफॉर्म खूप खास असतो. त्यांचा युनिफॉर्म पाहून सर्वांना गर्व वाटतो. सध्या पोलिसांचा युनिफॉर्म खुप चर्चेत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी हरियाणामधील राज्यांच्या गृहमंत्र्यांना संबोधित करताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिसांच्या पोशाखाबाबत सूचना केल्या आहेत. देशातील पोलिसांसाठी 'वन नेशन', 'वन युनिफॉर्म'चा (One Nation One Uniform) विचार केला जाऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.

  • 'वन नेशन', 'वन यूनिफॉर्म' म्हणजे काय?

'वन नेशन', 'वन यूनिफॉर्म' चा सरळ अर्थ म्हणजे एकच यूनिफॉर्म असणे. सध्या प्रेत्येक राज्यामधील पोलिसांचा यूनिफॉर्म हा वेगवेगळा आहे. जसे की, पदुचेरी पोलिसांचा यूनिफॉर्म खाकी आहे पण टोपीचा रंग लाल आहे. तर कोलकाता पोलिसांचा यूनिफॉर्म पाढऱ्या रंगाचा आहे. पण मोदींचे असे मानने आहे की, पोलिसांची ओळख देशभरात सारखीच असायला हवी.

Police Uniform
Popular Coffee Methods: स्टारबक्स अन् सीसीडी कॉफीचा घ्या घर बसल्या आस्वाद
  • पोलिसांच्या गणवेशाचा इतिहास काय आहे?

देशभरात अनेक पोलीसांचा (Police) युनिफॉर्म हा खाकी आहे, पण पूर्वी अशी स्थिती नव्हती. खाकीचा इतिहास 160 वर्षांचा आहे. 1847 मध्ये, सर हॅरी लॅन्सडेन, जे अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांनी खाकी युनिफॉर्म परिधान केला होता. यानंतर, लष्करी रेजिमेंट आणि पोलिस विभागाने अधिकृतपणे पूर्णपणे खाकी (Khaki) रंगाचा युनिफॉर्म स्वीकारला. तेव्हापासून हा युनिफॉर्म भारतीय पोलिसांची ओळख बनला आहे.

भारतात (India) पोलिसांच्या गणवेशाबाबत राज्यघटनेत कायदा आहे. यानुसार कोणतेही राज्य पोलिसांचा युनिफॉर्म आणि त्यांच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर निर्णय घेऊ शकते. संविधानाच्या सातव्या अनुसूचीच्या यादी 2 मध्ये त्याचा उल्लेख आहे. या अंतर्गत राज्य सरकारे त्यांच्या पोलीस आणि सुरक्षा दलांच्या युनिफॉर्मवर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांचा युनिफॉर्म वेगवेगळा दिसतो.

  • कर्नाटक

एकेकाळी कर्नाटकात पोलीस शॉर्ट पॅन्ट घालायचे. पण आता ते लॉंग पॅंट घालतात. तेथे हेड कॉन्स्टेबल कुर्ता आणि पोलिस हवालदार शर्ट घालतो. कर्नाटकात आजही रँकनुसार टोपी घातली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत कर्नाटकातील महिला पोलिसांना साड्या नेसत होत्या, पण आता त्याही पेंटचे शर्ट घालतात.

  • पुडुचेरी

पुद्दुचेरी पोलिसांचा (Police) युनिफॉर्म खाकी आहे पण टोपीचा रंग लाल आहे. खरे तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा भाग फ्रान्सचा गुलाम होता. फ्रान्सने पोलिसांना बाहेर उभे राहण्यासाठी लाल टोपी घालण्यास सांगितले होते. 1954 मध्ये फ्रान्सपासून वेगळे झाल्यानंतरही पुद्दुचेरीमध्ये ही प्रथा सुरू आहे.

  • कोलकाता

या राज्यात पोलिस अजूनही पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म घालतात. 1845 मध्ये कोलकाता येथे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर त्यांना पांढरा युनिफॉर्म देण्यात आला. कोलकाता पोलिसांनी खाकी वर्दी नाकारली होती. कारण कोलकाता हा किनारी भाग आहे. वातावरणात ओलावा अधिक आहे. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पांढरा रंग चांगला आहे.

  • उत्तर प्रदेश

या राज्यात 2018 मध्ये पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये मोठे बदल करण्यात आले. पूर्वी यूपी पोलिस सुती कापडाचा निफॉर्म घालायचे. आता शर्टचे कापड टेरीकॉटचे असेल आणि त्याचा रंग पॅंटच्या कापडापेक्षा हलका असेल. हाफ-स्लीव्ह शर्टचाही युनिफॉर्ममध्ये समावेश करण्यात आला होता, जेणेकरुन पोलिस कर्मचाऱ्यांना दुमडलेले बाही घालावे लागू नयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.