- मोनालिसा बागल, अश्विनी बागल
जेव्हा आपण काहीच बोलत नसतो, तेव्हाही केवळ आपल्या देहबोलीवरून आपल्या मनात काय आहे हे ओळखतात तेच असतात आपले मित्र... असंच मानणारी अभिनेत्री मोनालिसा बागल हिची बेस्ट फ्रेंड तिचीच मोठी बहीण अभिनेत्री अश्विनी बागल आहे.
या ‘सिस्टर कम बेस्ट फ्रेंड’ नात्याविषयी मोनालिसा म्हणाली, ‘लहानपणापासूनच ताईचं आणि माझं नातं बहिणींपेक्षा मैत्रिणींचंच जास्त राहिलं आहे. आमच्यात कधीच भांडणं नाही झालीत. आम्हा दोघींमध्ये इतका कम्फर्ट झोन आहे, की आम्ही एकमेकांशी काहीही गोष्टी शेअर करू शकतो. मी लहान असतानाच आमचे बाबा वारले. तेव्हापासून माझी आई आणि ताई याच माझ्या बेस्ट फ्रेंड्स झाल्या.