Original and Fake Cinnamon : काय! दालचिनी म्हणून तुम्हाला विकली जातेय पेरूची साल, खरी दालचिनी कशी ओळखायची?

बनावट दालचिनीचे सेवन केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो
Original and Fake Cinnamon
Original and Fake Cinnamonesakal
Updated on

Original and Fake Cinnamon :  घराचं महिन्याचं सामान भरताना तुम्ही हमखास मसाले घेता. त्यातही जेवणाची चव वाढवणारे खडे मसाले असतातच. खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र, दगडफूल अन् दालचिनी हे असतातच. तुम्ही दालचिनी म्हणून घेत असलेली झाडाची साल नक्की दालचिनीच आहे का? याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

दालचिनीचे आयुर्वेदातही अनेक फायदे सांगितले आहेत. कोणत्याही प्रकारच्या शाही फोडणीचा विचार केला तर ती दालचिनीशिवाय पूर्ण होत नाही. तर, टपरीवरच्या मसाले चहाची चवही दालचिनीच वाढवते.

अनेक झाडांची साल बाजारात दालचिनीच्या नावाने विकली जात आहे. जसे पेरू आणि कॅसियाची साल. खरं तर, सेम टू सेम दालचिनीच दिसत असते. त्यामुळे तुम्ही फुकटचे पैसे वाया घालवू नका. जर तुम्ही थोडे लक्ष दिले तर तुम्हाला खरी दालचिनी आणि बनावट दालचिनीमधील फरक समजू शकेल.  

Original and Fake Cinnamon
Cinnamon Tea Benefits: मासिक पाळीतील सर्व समस्यांवर उपायकारक असा दालचिनी चहा

बनावट दालचिनी विकण्यासाठी कॅसियाची साल वापरली जाते. जर तुम्ही कॅसियाच्या झाडाची साल बारकाईने पाहिली तर तिचा बाहेरील थर खडबडीत दिसेल. तर दालचिनीचा थर गुळगुळीत असतो. वास्तविक दालचिनी सिलोन दालचिनी म्हणून ओळखली जाते. या दालचिनीमध्ये कौमरिन नावाचे तत्व कमी असते त्यामुळे त्याचे सेवन फायदेशीर मानले जाते.

कौमरिन हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि हा घटक बनावट दालचिनीमध्ये आढळतो. बनावट दालचिनी कॅसिया दालचिनी म्हणून ओळखली जाते. ही दालचिनी मुख्यतः चीन आणि इंडोनेशियामध्ये आढळते. त्याची किंमतही स्वस्त आहे. परंतु तुम्ही ते वापरणे टाळावे. कॅसियाची साल दिसायला नक्कीच दालचिनीसारखी असू शकते. पण खऱ्या दालचिनीचा सुगंध आणि चव तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही खऱ्या आणि बनावट दालचिनीमधील फरक ओळखू शकाल.

Original and Fake Cinnamon
आजीचा बटवा : दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या

खरी आणि बनावट दालचिनी कशी ओळखायची

खऱ्या दालचिनीला गुळगुळीत आवरण असते

खऱ्या दालचिनीचा थर वरच्या बाजूला थोडासा गुळगुळीत असतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही दालचिनी खरेदी करायला जाल तेव्हा लक्षात ठेवा. तुम्ही दालचिनीचा थर काळजीपूर्वक पहा. त्याला स्पर्श करून खरेदी करा. त्यांच्या जागी पेरू आणि कॅसिया दालचिनीची साल असेल तर ती रूक्ष असते. तसेच, त्यांचा पोत खऱ्या दालचिनीसारखा असणार नाही.

दालचिनी पातळ रोल सारखी असते

जर तुम्ही दालचिनी पाहिली तर तुम्हाला समजेल की ते पातळ रोलसारखे आहे. ते इतके नाजूक आहे की त्याला स्पर्श करताच तो रोल तुटतो. जर तुम्ही नकली दालचिनी पाहिली, तर ती थेट सालाच्या स्वरूपात असेल. ज्यामध्ये रोलसारखी कोणतीही गोष्ट नसेल किंवा ती पोकळ असेल. ही तुटलेली आणि विखुरलेली जाड साल असेल. (Kitchen tips

Original and Fake Cinnamon
दिवाळीत चेहरा उजळ हवा आहे? घरीच बनवा दालचिनी वाॅटर

रंग आणि वासानुसार फरक जाणून घ्या

तुम्ही दालचिनीमधील फरक त्याच्या रंग आणि वासावरून ओळखू शकता. खऱ्या दालचिनीचा रंग हलका तपकिरी असतो. तर बनावट दालचिनीचा रंग गडद तपकिरी असू शकतो. याशिवाय, जेव्हा तुम्ही स्पर्श कराल आणि पहाल तेव्हा तुमच्या हातांना खोट्या दालचिनीचा रंग लागतो.

कारण अनेक वेळा ते रंगीत असतात. तर खऱ्या दालचिनीचा रंग निघत नाही. तसेच, बनावट दालचिनीचा वास तिखट आणि विचित्र आहे. तर खऱ्या दालचिनीचा वास थोडा गुळचट असतो. (Cinnamon)

Original and Fake Cinnamon
गोठोस येथील महिलांना मसाले बनविण्याचे धडे
खरी आणि बनावट दालचिनी कशी ओळखायची
खरी आणि बनावट दालचिनी कशी ओळखायची esakal

बनावट दालचिनीचा रंग गडद तपकिरी असतो

  1. बनावट दालचिनीचा बाहेरचा थर खडबडीत असतो.

  2. बनावट दालचिनीची चव गोड नसते आणि सुगंध तिखट असतो.

  3. बनावट दालचिनी रोल पोकळ आहेत.

  4. खोटी दालचिनी जाड आणि मजबूत आहे.

Original and Fake Cinnamon
Vegetable Market : टोमॅटोसह भाज्यांचे दर उतरले; कडधान्य, मसाले, किराणा साहित्य, खाद्य तेलांच्या दराची काय स्थिती?

तुम्ही बनावट दालचिनीचे सेवन केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो

  1. यकृत खराब होऊ शकते.

  2. ओटीपोटात वेदना आणि पेटके जाणवू शकतात.

  3. पचनसंस्थेच्या समस्या सुरू होतात.

  4. मळमळ किंवा उलट्या ही होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.