ओएलएफ आजार म्हणजे काय अन् जाणून घ्या लक्षण, एका क्लिकवर

मंज्जारज्जूच्या बाजूचे हाड वाढलेले, त्यामुळे हाता-पायांना आलेली कमजोरी, यासह ऑसिफाइड लिगामेंट फ्लेव्हम (ओएलएफ) हा दुर्मिळ आजार.
OLF
OLF
Updated on

मंज्जारज्जूच्या बाजूचे हाड वाढलेले, त्यामुळे हाता-पायांना आलेली कमजोरी, यासह ऑसिफाइड लिगामेंट फ्लेव्हम (ओएलएफ) हा दुर्मिळ आजार. यात दोन किंवा तीन मणक्यांपर्यंत नसेवर दाब येतो. स्पाइनच्या दुखण्यातील ५० हजार रुग्णांत एक आढळणारा हा आजार, अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मेडीकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी केली. यामुळे हाता-पायांत पुन्हा त्राण परतल्याने तिघांना नवजीवन मिळाले.

याबाबत मेडीकव्हरचे स्पाइन सर्जन डॉ. विवेक देशमुख म्हणाले, ओएलएफची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. ज्यामध्ये रुग्णाच्या नसेला कायमची कमजोरी आल्याने, हाता-पायांची ताकद गमावण्याची जोखीम असते. पॅरालिसिसचा धोकाही संभावतो. विशिष्ट अत्याधुनिक यंत्रसामग्री, मायक्रोस्कोप, बरहोलच्या साह्याने ही शस्त्रक्रिया केली जाते. मान, पाठ आणि कंबरेत नसेत आठ, अकरा आणि चौदा ठिकाणी दबलेल्या नसा मोकळ्या करण्याच्या दुर्मिळ शस्त्रक्रिया एकाच शस्त्रक्रियेत यशस्वी केल्याने रुग्णांना स्वतःच्या हालचाली स्वतः करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

पहिली केस

येवला (जि. नाशिक) येथील ४५ वर्षीय व्यक्तीला शंभर मीटर चालणेही शक्य नव्हते. दोन वर्षांपासून त्रास होता. विना आधार उभे राहणेही अवघड व्हायचे. एमआरआय स्कॅन केल्यावर आठ ठिकाणी मान, पाठ आणि कंबरेत नस दबलेली असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. दुसऱ्याच दिवशी चालणे शक्य झाले.

दुसरी केस

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ५० वर्षीय महिलेला हाता-पायांत बधिरता जाणवे. त्या चालू शकत नव्हत्या. ११ ठिकाणी मान, पाठ कंबरेत नस दबली असल्याचे त्यांचे निदान झाले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसांत त्या फिरू लागल्या.

तिसरी केस

जळगाव येथील ५२ वर्षीय महिलेला मानेत चार, पाठीत नऊ तर कंबरेत एका ठिकाणी नस दबली गेली होती. त्यामुळे त्या चालू शकत नव्हत्या. शस्त्रक्रियेनंतर त्या काठीच्या साहाय्याने चालू शकतात.

OLF
National Ice Cream Day 2024: मधुमेही घेऊ शकतात आइस्क्रीमचा आस्वाद, असे बनवा घरीच जांभूळ आइस्क्रीम

का होतो ओएलएफ हा आजार?

वयोमानानुसार, आनुवंशिकता, चुकीच्या पद्धतीच्या बैठका, वाहनांचे झटके, हाडांच्या आजारामुळे हा आजार होण्याची संभावना असते.

अशी आहेत लक्षणे?

हाता-पायांना मुंग्या येणे, हातातून वस्तू पडणे, चालताना तोल जाणे, जास्त चालता न येणे अशी लक्षणे या आजारात आढळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com