Oxidised Jewellery Fashion : सध्या ऑक्सिडाइज ज्वेलरीची वेगळीच आवड निर्माण झाली आहे, आधी मुली रोजच्या वापरासाठी किंवा कुर्त्यावर वापरता येतील असे झुमके विकत घ्यायच्या. पण आता वन पीस, जीन्स टॉप, क्रॉप टॉप पासून अगदी स्कर्ट आणि त्याही पल्याड जात अगदी पारंपरिक ज्वेलरी सुद्धा ऑक्सिडाइज प्रकारात बाजारात उपलब्ध आहे.
सेलेब्रिटींनाही याचा मोह आवरला नाहीये, अनेक मुली आजकाल आपल्या ड्रेस सोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी घालणं पसंत करतात. तुमच्याकडेही त्याचा साठा असेलच, पण एक विचार हा केला आहे का? की एकच कानातल्याचा जोड प्रत्येका आउटफिट सोबत परफेक्ट गेला तर? म्हणजे कुर्त्या पासून तर साडी पर्यन्त सगळ्यांवरती जाईल असे कानातले.
प्रत्येका आउटफिटसोबत जाणारे हे पाच प्रकारचे कानातले तुमच्याकडे असलेच पाहिजे.
1 .सध्या लॉन्ग आणि हेवी कानातले घालण्याची फॅशन सुरू आहे; त्यात अशा स्टाईलचे झुमके तुम्हाला खूप उठून दिसतील; जर तुमचा चेहरा हा उभा किंवा लांबोळका असेल तर हे कानातले तुम्हाला उठून दिसतील. तुम्ही हे कानातले रेग्युलर कुर्त्यावर, स्कर्टवर किंवा लॉन्ग श्रग आणि क्रॉप टॉप जीन्सवर पण घालू शकतात.
2 . हे कानातले जरा बाजारात नवीन आहेत; आणि मुळात अनेकांसाठी आकर्षण, एका गोल रिंगच्या मध्ये झुमका लावल्याने याच वेगळच आकर्षण आहे. ज्यांना फार मोठे कानातले घालायला आवडत नाही किंवा त्याने कान त्याने कान दुखतात अशांसाठी हे कानातले परफेक्ट आहेत. तुम्ही हे कानातले तुमच्या पार्टी वेअर वन पीस वर किंवा स्कर्ट वर किंवा प्लेन साडीवरही घालू शकतात.
3 .पोपटाची किंवा मोराची डिझाईन असलेले कानातले तुमच्याकडे असेलच, पण त्यात पूर्ण कानावर कर्णफुलासारखी दिसतील असे कानातले ऑक्सिडाइज कानातले आहेत का? ज्यांना इंडो वेस्टर्न लुक ट्राय करायचा असतो असे लोकं हे कानातले घेऊ शकतात. जीन्स त्यावर श्रग आणि क्रॉप टॉप अशा ट्रेंडी लुक पासून अगदी साडीवरही हे कानातले शोभून दिसतील.
4 . ज्यांना मुळातच छोटे कानातले घालायला आवडतात अशांसाठी हे झुमके बेस्ट आहेत. छान लाल रंगाने मिनाकारी केल्याने हे तुम्हाला हलकासा साऊथ इंडियन लुक देऊन जातात; वजनालाही हे हलके आहेत. आणि तुमच्या डे टु डे लुक साठी अगदीच परफेक्ट.
5 . दिसायला छोटे, वजनाला हलके आणि तरीही प्रत्येका लुक वर जातील असे कानातले शोधत आहात? मग हे कानातले त्यासाठी परफेक्ट आहेत. फुलाचे टॉप आणि त्याखाली झुमका ज्यावर बारीक राजस्थानी डिझाईन केलेली आहे आणि एक लाल खडा लावलेला आहे. हे कानातले तुम्हाला खूप उठून दिसतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.