मुलांना दिवळीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे घरात मुलांचा किलबिलाट असेल. अत्या अन् मामाच्या मुलांसोबत त्यांचा ग्रूप बनला असेल. मुलं खेळून खेळून दमतात. त्यामुळे, त्यांना सतत भूक लागते. सायंकाळच्या वेळी मुलांना लागणाऱ्या भुकेसाठी पनीर 65 हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
मुलांना बाहेरील खाण्यात पिझ्झा, बर्गर असे पदार्थ आवडतात. त्यामुळे अशा फास्ट फूडपेक्षा पनीर मुलांसाठी अधिक पौष्टिक आहे. त्यामुळे, तुम्ही मुलांना पनीर 65 बनवून देऊ शकता. मुलांच्या समोर ठेवताच क्षणी फस्त होतील असे खमंग पनीर कसे बनवायचे हे पाहुयात.
पनीर - 400 ग्रॅम, मीठ - ¾ टीस्पून, धने पावडर-1 टीस्पून, काश्मिरी लाल मिरची-2 टीस्पून,हळद पावडर- ½ टीस्पून, काळी मिरी-½ टीस्पून, जिरे पावडर-½ टीस्पून, मैदा-2 टेस्पून, कॉर्न फ्लोअर-2 चमचे, लिंबाचा रस - 2 टीस्पून, आले मिरची पेस्ट - 2 टीस्पून, तेल - 2 टीस्पून, मोहरी - ½ टीस्पून,जिरे - ½ टीस्पून, कढीपत्ता - 15-20, आले ज्युलियन - 10-15, हिरव्या मिरची - 4 तुकडे
पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्य. आता एका भांड्यात मीठ, धने पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, काळी मिरी, जिरे पावडर, मैदा आणि 2 चमचे चमचा कॉर्नफ्लोर घाला.
हे चांगले एकजीव करा आता यात पनीरचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. नंतर २ चमचे लिंबाचा रस, २ चमचे आले हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. ते चांगले मिसळा आणि 2-3 चमचे पाणी घाला आणि चांगले मिसळा.
कढईत तेल गरम करा, तेल जास्त गरम अन् जास्त थंड नसेल याची काळजी घ्या. एकावेळी पनीरचे जास्तीत जास्त तुकडे गरम तेलात टाका आणि 3-4 मिनिटे तळून घ्या.
कढईत २ चमचे तेल टाकून गरम करा. यात मोहरी जिऱ्याची फोडणी घाला. आता यात 4-5 हिरव्या मिरच्या टाका आणि हलके तळून घ्या. भाजून झाल्यावर त्यात तळलेले पनीर 65 टाका आणि चांगले मिक्स करा.
एकजीव झाल्यावर थोडे मीठ आणि थोडी हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा. अशा प्रकारे पनीर 65 तयार होईल. त्यांना हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.