Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

आजच्या दिवशी तुम्ही पनीरची खीर बाप्पाच्या नैवेद्याला बनवू शकता
Paneer Kheer
Paneer Kheeresakal
Updated on

Paneer Kheer :

पनीर हे सुपरफूड असून त्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. भारतात पनीर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तुम्हालाही पनीरची भाजी, पकोडो खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन करून बघायचे असेल तर तुम्ही ही पनीर खीर करून पाहू शकता.

तुम्ही अनेकदा मटर पनीर सब्जी, शाही पनीर, पनीर पराठा, पनीर टिक्का या स्वरूपात पनीरचे सेवन केले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही पनीरपासूनही खीर बनवू शकता? होय, आणि ते केवळ चवदारच नाही तर निरोगी देखील आहे. (Sweet recipe)

आज संकष्टी चतुर्थी आहे. गणपतीबाप्पासाठी हे महिन्याचे व्रत खास आहे. या दिवशी प्रत्येक घरात उपवास केला जातो. तर, चंद्रोदय पाहून मगच उपवास सोडला जातो. आज संकष्टी आहे. आजच्या दिवशी तुम्ही पनीरची खीर बाप्पाच्या नैवेद्याला बनवू शकता.

Paneer Kheer
Sweet Potato : थंडीच्या दिवसांत रताळे खाणे अतिशय गुणकारी, शरीराला होतील अनेक फायदे

संकष्टीचा मुहूर्त कधी आहे

संकष्टी चतुर्थी आज खूप खास मानली जाते कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग आज पहाटे ५.२५ वाजता सुरू झाला असून त्याची समाप्ती सकाळी १०.३६ वाजता होईल.

Paneer Kheer
Dudhi Bhopla Kheer : पावसाळ्यात पौष्टिक खायचं आहे? दुधी भोपळ्याची खीर ट्राय करा

साहीत्य -

२५० ग्रॅम पनीर, २ लिटर दूध, १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ सपाट वाटी साखर, वेलदोडा पूड अथवा केवडा इसेन्स.

कृती -

पनीर विकतचे आणणार असाल तर ते फ्रेश आणावे. ताजे पनीर पांढरेशुभ्र दिसते. शिळे पनीर पिवळट दिसते.

पनीर घरी करायचे असल्यास १ लिटर दूध उकळी आल्यावर २ टे. स्पून व्हाईट व्हिनीगर घालून फाडावे. मलमलच्या फडक्यावर घालून त्यावर वजन ठेवावे. पाटा ठेवल्यास उत्तम, पाणी पुरते निघाले पाहिजे.

४ ते ५ तासात पनीर होते. एक लिटर उत्तम स्निग्धांश असलेल्या दूधाचे पाव किलो पनीर होते. (३) पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करावेत.

Paneer Kheer
Healthy Makhana Kheer: मखाणा खीर बनेल आरोग्यदायी, फॉलो करा 'या' टिप्स

खीरीसाठी -

२ लिटर दूध आटवावे. १ चमचा कॉनफ्लोअर लावून घट्ट होईपर्यंत निम्मे आटवावे. साखर घालून एक उकळी येऊन साखर विरघळली की खाली उतरवून गार करावे. गार झाल्यावर पनीरचे तुकडे, केवडा इसेन्स घालून फ्रीजमध्ये गार करून सर्व्ह करावी.

पनीरचे तुकडे करण्याऐवजी जाड बटाटे किसण्याच्या किसणीवर किसून घातले तरी खीर मिळून येते. दूध गरम असताना पनीर मिसळू नये. सजावटीला गावठी गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.