प्रत्येक महिलेच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असतो मासिक पाळी. कारण, तरूणपणाची ती ओळख असते. तसेच, वयाची उतरती कळा लागली की पाळी बंद होते. प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचे चक्र वेगवेगळे असते. स्त्रिच्या शारीरिक ठेवीनुसार हे चक्र सुरू असते.
काही मुली आहेत ज्या वयात लवकर येतात. तर काहींना पाळी उशीरा येते. प्रत्येकीला महिन्यातून एकदा या पाळीचा सामना करावा लागतो. काही महिलांची तारखेवर पाळी येते. तर काहींची वेळे आधी अन् काही दिवस उशीराही येते.