Parenting Tips : बाळाचा रंग दर तीन महिन्यांनी बदलतो, हे खंरय का?

केशर खाल्ल्याने बाळ गोरं होईल,यात काही तथ्य आहे का
Parenting Tips
Parenting Tipsesakal
Updated on

Parenting Tips :

कोणत्याही घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला की सारे घर त्याची सेवा करण्यात मग्न होते. आई-वडील होण्याचा अनुभव वेगळा असतो, जेव्हा जेव्हा एखाद्या कुटुंबात मूल जन्माला येते, तेव्हा लोक मूल पाहतात, त्याची वैशिष्ट्ये आणि वर्ण, रंग पाहून ते आपल्या आईसारखे, त्यांच्या वडिलांसारखे, त्यांच्या आजोबासारखे आहे की नाही याचा अंदाज लावू लागतात.

तो आजोबांसारखा आहे की कुटुंबातील इतर कोणता सदस्य? अनेक वेळा असे देखील दिसून आले आहे की मूल जन्माला आले की ते गोरे दिसायला लागते पण कालांतराने त्याचा रंग सावळा होऊ लागतो, अशा परिस्थितीत पालक चिंतेत पडतात आणि मुलाला गोरा बनवण्यासाठी विविध पद्धतींचे प्रयोग लागतात.

Parenting Tips
Winter Baby Care : थंडीत आजारांपासून मुलांना ठेवा दूर; 'या' टीप्सच्या मदतीने घ्या काळजी

या लेखात आपण डॉ. गौरव कुमार यांच्याकडून जाणून घेणार आहोत की, जन्मानंतर बाळाचा रंग बदलतो का.

जन्मानंतर बाळाचा रंग डार्क का होतो?

ज्या कुटुंबातील लोक जन्माच्या वेळी मुलाला भेटतात ते त्याला पाहून बाळ किती गोरं,सुंदर आहे असे म्हणतात. परंतु जेव्हा तेच लोक 2 ते 3 महिन्यांनंतर मुलाला पाहतात तेव्हा त्यांना मुलाचा रंग पाहून धक्का बसतो आणि तो काळसर कसा झाला याचे आश्चर्य वाटते.

अशा स्थितीत घरातील वडीलधारी मंडळीही म्हणू लागतात की मुलाची योग्य काळजी घेतली जात नाही आणि अशक्तपणामुळे रंग काळपट दिसू लागतो.

खरं तर, असं काही नसतं. बाळाचा रंग बदलत राहतो. पण त्याचा रंग बदलला म्हणून आईला, कुटुंबातील सदस्यांना टोमणे देखील मारले जातात. पण यात काही तथ्य नाही. कारण, कितीही काळजी घेतली तरी बाळ त्याच्या मूळ रंगात येतं.

Parenting Tips
Winter Baby Care : थंडीत आजारांपासून मुलांना ठेवा दूर; 'या' टीप्सच्या मदतीने घ्या काळजी

लोकांचं ऐकून  लोक बाळाला बेबी वॉश किंवा साबणाने घासून आंघोळ घालू लागतात, जे मुलासाठी हानिकारक देखील ठरू शकते. जे त्याला भविष्यात आजारी पाडू शकतं.

डॉ. गौरव सांगतात की, बाळाचा खरा रंग 3 महिन्यांनंतरच दिसतो आणि जन्माच्या वेळी मूल गोरा दिसत असलं, तरी त्याचा रंग प्रत्यक्षात त्याच्या जनुकांवर अवलंबून असतो. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की बाळाचा रंग कधी बदलतो? यावर डॉक्टरांनी सांगितले की, 3 ते 6 महिन्यांत बाळाचा मूळ रंग मुलावर दिसून येतो आणि या काळात बाळाच्या रंगात अनेक बदल होतात.

Parenting Tips
Swara Bhaskar Baby: स्वराच्या घरी अनोखं सेलिब्रेशन, नातीच्या आगमनाने आजोबा झालेत भलतेच खुश

अनेक स्त्रिया आपल्या मुलाच्या जन्माआधीच केशर सेवन करू लागतात. त्यामुळे मुलांचा रंग गोरा होऊ शकतो, असे म्हटले जाते. तर असे होत नाही. डॉक्टरांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान केशरचे सेवन असो किंवा जन्मानंतर विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर असो, कोणत्याही गोष्टीने मुलाचा रंग बदलू शकत नाही. 

उन्हामुळे मुलांच्या रंगात फरक पडतो का?

डॉक्टरांनी सांगितले की सूर्यप्रकाश, पाणी, प्रदूषण आणि सौंदर्यप्रसाधने काही दिवस मुलाच्या रंगावर परिणाम करू शकतात परंतु ते मुलाचा रंग बदलू शकत नाहीत. सकाळचा हलका सूर्यप्रकाश हिवाळ्यात मुलांसाठी फायदेशीर असतो. यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होते आणि मूल निरोगी राहते.

Parenting Tips
Baby Girls Name : मुलीसाठी हटके नाव शोधताय? ही क्यूट नावे तुमच्यासाठी ठरतील बेस्ट ऑप्शन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.