Parenting Tips : हिवाळ्यात मूलं सतत आजारी पडतायंत?; त्यांच्या खाण्यात आजच बदल करा आणि फरक बघा!

तुम्ही आपल्या मुलांना योग्य व पोषक आहार देऊन या आजारांपासून वाचवू शकता.
Parenting Tips
Parenting TipsEsakal
Updated on

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी असते. त्यामुळे मुलांना अगदी सहज व्हायरल आजार होतात. थंडीचा ऋतू म्हणजे साथीच्या रोगांचा महिना म्हणून ओळखला जातो. तुमची मुले आधीपासूनच आजारी असतील तर थंडीच्या महिन्यात त्यांचा त्रास अजूनच वाढू शकतो.

घशात घवघवणे, सर्दी-पडसं, ताप, न्युमोनिया, पोटातील इनफेक्शन, त्वचेशी निगडीत समस्या आणि अस्थमा सारखे आजार विळखा घालतात. हे आजार हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतात. यामूळेच तुम्ही आपल्या मुलांना योग्य व पोषक आहार देऊन या आजारांपासून वाचवू शकता.

Parenting Tips
Parenting Tips: आईवडिलांमधील भांडण 'नॉर्मल' समजणं बंद करा, मुलांवर होतात हे परिणाम

आज आम्ही तुम्हाला त्या ५ पदार्थांविषयी माहिती देणार आहोत जे थंडीच्या दिवसांत मुलांपासून दूर ठेवले पाहिजेत. हे पदार्थ हिवाळ्यात मुलांपासून दूर ठेऊन तुम्ही त्यांना भरपूर प्रमाणात सुरक्षित ठेऊ शकता.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांचा Confidence कसा वाढवाल? पालकांनो...

तेलकट पदार्थ

तेलकट पदार्थ खाणे मुलांना आजाराच्या जवळ नेऊ शकते. लोणी व ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड, म्यूकस आणि सलाइवामध्ये समस्या निर्माण करु शकतात. तेलकट पदार्थ खाताना टेस्टी लागतात पण आरोग्यास ते अतिशय हानीकारक असतात. त्यामुळे लहान मुलांना हिवाळ्यात तेलकट पदार्थ खाऊ न घालणे हेच चांगले असते.

Parenting Tips
Parenting Tips: मुलं कंटाळा आलाय म्हणतायंत? रागावण्याऐवजी हे करता येईल!

गोड पदार्थ कमीच असावेत

हिवाळा असो वा उन्हाळा आपल्या मुलांना सतत गोड खाण्यापासून दूर ठेवणंच कधीही चांगलं असतं. शरीरात साखरेची पातळी जास्त झाल्यामुळे पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते. मुलांना गोड पदार्थ खाऊ घातल्याने त्यांना व्हायरल व बॅक्टेरियल इन्फेक्शनची समस्या वाढू शकते. त्यामूळे लहान मुलांना खास करुन थंडीच्या दिवसांत सोडा, कोल्ड ड्रिंक्स, कॅंडीज, चॉकलेट, रिफाइंड व प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ घालू नयेत.

Parenting Tips
Parenting Tips : धक्कादायक ! I Q वगैरे असलं काही नसतं, वाचा काय सांगतो रिसर्च

मेयोनीज

मेयोनीजमध्ये हिस्टामाइन भरपूर प्रमाणात असते. हे केमिकल शरीराला एलर्जीशी लढा देण्यास लाभदायक ठरते. पण हिवाळ्यात हिस्टामाइन राईस फुड  खाल्ल्याने म्यूकसची समस्या उद्भवू शकते. हे घशाच्या समस्येचे कारण बनू शकते.

टॉमेटो, अ‍ॅव्होकाडो, वांगी, मेयोनीज, मशरुम व्हिनेगर, ताक व लोणच्यामध्ये मेयोनीज वापरुन बनवले जाणारे पदार्थ जसं की, सॅंडवीच, फ्रॅंकी, मेयोनीज वडापाव हे खाणे बंद करावे.

Parenting Tips
Parenting Tips: पालकांच्या अति काळजीमुळे बिघडतेय तरुण पिढी? या चुका टाळा

दुग्धजन्य पदार्थ

मासांहारापासून मिळणारे प्रत्येक प्रकारचे प्रोटीन लाळ व कफची  समस्या निर्माण करतात. ज्यामुळे मुलांना अन्न गिळण्यास त्रास होतो. त्यामुळे मुलांना  चीज, क्रीम असलेले सूप आणि डिप्स खाऊ घालू नका. मुलांना आधीपासून कफची समस्या असेल तर हे पदार्थ अजिबात देऊ नयेत.

मांसांहारही प्रमाणात असावा

मासांहारात प्रोटीन जास्त असतं जे म्यूकस (बुरशी) बनवण्याचे कार्य करते. त्यामुळे घशात समस्या होऊ शकते. प्रक्रिया केलेले मासंहारी पदार्थ व अंडी  हिवाळ्याच्या दिवसांत मुलांना अजिबात खाऊ घालू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.