When The Child Starts Giving The Opposite Answer : टिनेज मुलांना योग्य आणि आदरयुक्त बोलायला शिकवायला फार मेहनत लागते. स्मार्टफोन आणि टीव्हीमुळे मुलांची भाषेला कंट्रोल करणं अजूनच कठीण झालं आहे. पालक मुलांच्या या वागण्याने काळजीत असतात. पण अशावेळी त्यांनी अधिक धैर्याने आणि संयमाने वागायला हवे.
अशावेळी पालकांनी कसं वागावं, जाणून घ्या
आजकाल मुलं जास्तीत जास्त वेळ इलेक्ट्रॉनिक डिवाइस सोबत घालवतात. त्यांना पालकांच्या सुचना, सल्ले बोर वाटतात. पण अशा परिस्थितीत पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांशी संवाद साधावा.
मुलांना रागवण्या ऐवजी समजवावं. जर मुलांच्या वागण्यावर पालकही उलट उत्तर द्यायला लागले तर मुलं त्यांचा आदर करणं बंद करतात.
मुलांचे मित्र बनण्याचा आग्रह धरण्याऐवजी पालक बनून समजून घेणं आणि सांगणं आवश्यक आहे. आजकाल पालक मुलांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतात, पण मुलं त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे मित्र बनण्याआधी पालक बनून चांगलं वाईट समजून सांगणं आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.