Child Health Tips तुमचे बाळ दूध पीत नाही? तर कॅल्शिअमची कमतरता ‘या’ पदार्थांनी काढा भरून

आपल्या मुलांच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघण्यास मदत मिळेल.
parenting tips in marathi
parenting tips in marathi sakal
Updated on

लहान मुलांचं आरोग्य निरोगी राहावे, यासाठी त्यांच्या शरीरास कॅल्शिअमचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच पालक त्यांच्या नाश्त्यामध्ये व रात्री झोपण्यापूर्वी त्यांना एक ग्लास दूध प्यायला नक्कीच देतात.

parenting tips in marathi
Child Health: पालकांनो, मुलांना ‘या’ ७ गोष्टींपासून दूर ठेवा अन् वाढवा मेंदूची कुशाग्रता; संतुलित आहार व मेडिटेशनचा होईल लाभ

पण बहुतांश वेळेस लहान मुले दूध पिताना अतिशय नखरे करतात. त्यांना दूध पाजणे म्हणजे पालकांची तारेवरची कसरत असते. पण समजा तुमचं बाळ दूध पितच नसतील तर त्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्याद्वारे त्यांच्या शरीरास कॅल्शिअमची पूर्तात होण्यास मदत मिळेल.  

parenting tips in marathi
Child Eye Care Tips : सतत पडणारा मोबाईलचा प्रकाश मुलांच्या डोळ्यांसाठी घातक! तज्ज्ञ सांगतात...

कॅल्शिअमयुक्त पदार्थ 

तुमच्या बाळाला दूध प्यायला आवडत नसेल त्यांच्या डाएटमध्ये सुकामेव्याचा समावेश करा. सुकामेव्यामध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, मॅग्नेशिअम आणि अन्य जीवनसत्त्वांचा समावेश असतो. तर दुधास पर्याय म्हणून आपण मुलांना अक्रोड, बदाम, मनुके, पिस्ता अन्य सुकामेवा खाऊ घालू शकता. 

parenting tips in marathi
Child Care : मुलांना या वयानंतरच लोणचं खाऊ घाला, नाहीतर मुलांमध्ये वाढेल अ‍ॅसिडीटीचा त्रास

सोयाबीन

सोयाबीनमध्यही कॅल्शिअमचा साठा मुबलक प्रमाणात असतो. यामध्ये लोह आणि प्रोटीन यासारखे पोषणतत्त्वही आहेत. या पोषकघटकांमुळे लहान मुलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

नाचणी

नाचणीचे सेवन केल्यासही शरीरास कॅल्शिअमचा पुरवठा होण्यास मदत मिळते. गहुच्या पिठाऐवजी आपण मुलांना नाचणीची भाकरी खाण्यास देऊ शकता.

पालक

पालकच्या भाजीमध्ये कॅल्शिअमचा साठा भरपूर प्रमाणात असतो. याशिवाय आपण आपल्या मुलांच्या डाएटमध्ये जितक्या जास्त प्रमाणात हिरव्या भाज्यांचा समावेश कराल, तितके जास्त फायदे त्यांच्या आरोग्यास मिळतील. यातील पोषकघटकांमुळे मुलांचा शारीरिक तसंच मानसिक विकास योग्य पद्धतीने होईल. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.