प्रत्येक पालकाचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असतंच. मात्र अनेकदा कामाचा ताण, दररोजच्या जीवनात समोर येणारी विविध आव्हानं आणि अडथळे तसचं मुलांचं संगोपन त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरु असलेली धडपड यामुळे अनेकदा पालकांना Parents मुलांसाठीच वेळ देणं शक्य होत नाही. Parenting Tips in Marathi spare only nine minutes with your children for their growth
यामुळे मुलं आणि पालकांमधील अंतर वाढू लागतं. अनेकदा मुलं एकाकी होतात. काही वेळा तर ती कमी वयातच स्वतंत्र होतात आणि आई-वडिलांशी न कळत दुरावा निर्माण होतो. जर तुम्हालाही धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांसोबतच्या Children नात्याची विण घट्ट करायची असेल तर दिवसातील काही मिनिटं त्यांच्यासाठी काढणं गरजेचं आहे. दिवसभरातील केवळ ९ मिनिटं देखील तुमचं मुलांसोबतच नातं Bonding मजबूत करु शकतात. Parenting Tips
होय, एका अभ्यासानुसार Study दिवसभरातील ९ मिनिटं जर तुम्ही तुमच्या मुलांशी भावनात्मकरित्या संवाद साधलात त्यांच्यासोबत वेळ घालवलात तरी तुमचं तुमच्या मुलांसोबच एक सुंदर नात निर्माण होवू शकतं आणि तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होवू शकतं. या ९ मिनिटांमध्ये नेमकं काय करावं असं प्रश्न अनेकांना पडेल.
दिवसाच्या सुरुवातीचे ३ मिनिटं
दिवसाची सुरुवात म्हणजेच मुलं सकाळी उठतात त्यावेळचे ३ मिनिटं ही महत्वाची आहेत. अनेकदा मुलांना गडबडीत उठवून आई-वडिल आपापल्या कामांमध्ये गुंततात किंवा ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतात. मात्र सकाळची सुरुवात ही मुलांसोबत करा.
सकाळी केवळ ३ मिनिटं मुलांना प्रेमाने उठवण्यासाठी द्या. त्यांना हसत अंथरुणातून उठवा. त्याना जवळ घेत गुड मार्निंग किंवा सुप्रभात म्हणा. यामुळे तुमच्या आणि मुलांच्याही दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल आणि दिवसभरासाठी दोघांनाही ऊर्जा मिळेल.
हे देखिल वाचा-
दिवसभरातील ३ मिनिटं
संपूर्ण दिवसभरातील कोणतीही ३ मिनिटं आवर्जुन मुलांसाठी काढा. यावेळी इतर काम न करता आवर्जुन त्यांच्याशी संवाद साधा. मुलं शाळेतून किंवा शिकवणीवरून आल्यावर किंवा जेवण करत असताना तुम्ही ही ३ मिनिटं देऊ शकता. यावेळी शाळेत काय झालं, मित्र मैत्रिणी किंवा त्यांच्या आवडत्या छंदाबद्दल गप्पा मारा. सुट्टीचे प्लान आखा.
यामुळे त्यांना आपल्या पालकांना आपल्याबद्दल आपुलकी असल्याची भावना निर्माण होईल आणि त्यांचा पालकांवरील आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही नोकरदार असाल तर दिवसातून किमान १ फोन कॉल करून त्यांची विचारपूस करा. या कॉलमध्ये अभ्यास किंवा इतर कामाबद्दल चर्चा करण्याएवजी सहज काही गप्पा मारा.
दिवसाअखेरची ३ मिनिटं
रात्री झोपताना मुलांसोबत दिवसभरातील अनुभवांबद्दल चर्चा करा. त्यांच्या गप्पा किंवा अनुभव जाणून घेण्यात रस दाखवा. त्यांची स्वप्न जाणून घ्या, त्यांच्या गोष्टी ऐका किंवा त्यांना गोष्टी सांगा. मुलांसोबत बेडटाइम घालवणं हा त्यांच्यासोबतच नातं घट्ट करण्याची एक उत्तम संधी समजली जाते.
त्यामुळेच मुलांना ही ९ मिनिटं देणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष द्या. त्यांच्या प्रत्येक कृतीला किंवा गोष्टीवर लगेचच विरोध करू नका किंवा नकारात्मकतेने व्यक्त होवू नका. त्यांच मत, प्रश्न, शंका जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं मुलांसोबतच नात घट्ट होण्यासाठी मदत होईल.
या ९ मिनिटांमुळे तुमच्या मुलांमध्ये तुमच्याबद्दल भावनात्मक ओढ निर्माण होईल. ते तुमचा आदर करू लागतील. त्यांना स्वत:हून तुमच्याशी अनेक गोष्टी शेअर करण्याची आणि वेळ घालवण्याची इच्छा निर्माण होईल.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.