Parenting Tips : ‘हम दो हमारा एक’; एकुलत्या एका बाळाला लाडावू नका तर जबाबदार बनवा, या टिप्स येतील कामी

घरात एक बाळ असो वा दोन मुलांना कधीच स्वत:वर अवलंबून ठेऊ नका
Parenting Tips
Parenting Tipsesakal
Updated on

Parenting Tips :

घरात एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवल्या जातात. बाळ लहान असतं तोवरच त्याला इंजिनिअर, डॉक्टर होणार असं घरचे ठरवतात. बरं केवळ करिअर नाहीतर सगळ्याच बाबतील बाळ आपल्याला समजून घेईल असं चित्र मनात तयार केलं जातं. बाळाचे लाड पुरवले जातात. बाळाच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं.

त्यातही घरात एकच बाळ असेल तर त्याचे अति लाड होतात. सगळे त्याच्याकडेच लक्ष देतात त्याची काळजी घेतात. पण पालकांनी सतत असं त्याच्या आसपास असल्यानं मुलं आळशी आणि हट्टी व्हायला लागतात. त्यामुळे मुलांना वळण लागत नाही.

तुम्हीही एक सिंगल पालक असाल तर इतरांपेक्षा जरा जास्त जबाबदारी तुमच्यावर असते. कारण,तुम्हाला केवळ तुमच्या मुलाला वाढवायचं नसतं. तर, त्याला लाडाने बिघडण्यापासून थांबवायचं असतं. त्यामुळेच तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी हे पाहुयात. (Parenting Tips In Marathi)

Parenting Tips
Parenting Tips: मुलांना लागलेली मोबाईल पाहण्याची सवय मोडायचीये? मग या टिप्स नक्की ट्राय करा

मुलांना अवलंबून ठेऊ नका

घरात एक बाळ असो वा दोन मुलांना कधीच स्वत:वर अवलंबून ठेऊ नका. तीन चार वर्षापर्यंत मुलांना स्वत:च वॉशरूमला जाण्याची सवय लावा. मुलांना स्वत:च्या हाताने खाण्याची सवय लावा. तुम्ही असे केले नाही. तर मुलं तुमचा गैरफायदा घेतील. लहान आहे म्हणून दुर्लक्ष करू नका कारण पुन्हा याचा मुलांना जास्त त्रास होईल. (Single Child Parenting)

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा

मुलांना लाडावून हट्टी बनवण्यात जसं पालकांची भुमिका असते. अगदी त्याचप्रमाणे मुलांना धाडसी, आत्मविश्वासू बनवण्यातही पालक मदत करू शकतात. मुलांना कामाची सवय लावा. मुलांना बाजारात वस्तू आणण्यासाठी पाठवा. मुलं वाढत्या वयात धाडसी बनली तर ती आयुष्यभर कधीच कोणत्या गोष्टीला घाबरणार नाहीत.

Parenting Tips
Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मग या टिप्स फॉलो करा, मुलांना लागेल शाळेत जाण्याची गोडी

मुलांना चुकांमधून शिकू द्या

लहान मुलांसाठी घर, वस्तू हे जग नवं असतं. तेव्हा मुलांना त्यांच्या कलेने शिकू द्या. मुलांकडून एखादी गोष्ट तुटली तर न रागवता त्यांना समजावून सांगा. असे केल्याने मुलांना जबाबदारीची जाणिव होईल. आणि तुम्ही सतत मुलांना दोष देत राहीलात तर ती कधीच पुन्ही त्या गोष्टी शिकणार नाहीत.

चांगलं नात निर्माण करा

मुलांना सतत असं वाटत असतं की आई वडील आपल्यावर कधीच नाराज होऊ नयेत. त्यांनी प्रत्येकवेळी समजून घ्यावं. पण तसं होत नाही. त्यामुळे पालकांची ही मोठी जबाबदारी असते की, मुलांमध्ये असलेले सकारात्मक गुण वाढवा. मुलांमध्ये असलेल्या गणांना ओळखून त्यांच्यासाठी नव्या गोष्टी घ्या. मुलांना प्रोत्साहन द्या. असे केले तर मुलं आणि तुमच्यातील नातं सुरळीत होऊ शकेल.

Parenting Tips
Parenting Tips : मुलं शाळेत जायला नकार देतायत? मग या टिप्स फॉलो करा, मुलांना लागेल शाळेत जाण्याची गोडी

मुलांचा हट्ट पुरवताना विचार करा

काही वेळा मुलं खूश व्हावीत म्हणून मागतील ती गोष्ट आणून दिली जाते. प्रत्येकवेळी मुलांना वस्तू, खेळणी आणून देणं. आणि मुलाने एखादी वस्तू फोडल्यावर ‘तुला त्या वस्तूची किंमत नाही, मी तूला काहीच घेऊन येणार नाही’ असे ऐकवले तर मुलं अधिक हट्टी बनतात.

मुलांना या टोमण्यांमुळे जास्त राग येतो. तेव्हा असे न करता मुलांना गरजेच्या वस्तू आणून द्या आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा. मुलांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्या तरच तुमच्यात आणि पाल्यामध्ये चांगलं नातं निर्माण होईल.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांना सतत नियंत्रणात ठेवलं म्हणजे पालकत्व जमलं असं नाही, आधी त्याचे परिणाम समजून घ्या

मुलांवर निर्णय थोपवू नका

पालक मुलं लहान असतं तेव्हापासूनच मुलावर इच्छा थोपवतात. अगदी ड्रेस कोणता घ्यावा ते कॉलेज, करिअरचे निर्णयही पालक घेतात. अशामुळे मुलांमध्ये न्युनगंड निर्माण होतो की, मी एखादा निर्णय घेऊ शकत नाही.

त्यामुळे मुलं पालकांना विचारल्याशिवाय काहीही करत नाहीत. त्यामुळे मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी त्यांचे त्यांना निर्णय घेऊदेत. निर्णय चुकला तरी धडपडतील आणि पुन्हा उठून चालतील. तुम्ही फक्त त्यांच्या यश अपयशात सोबत रहा.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.