लहान मुलं निरागस असतात. घरभर फिरण्याची सवय त्यांना लागते तेव्हा सर्वकाही उचलून सरळ तोंडात टाकतात. अशा मुलांकडे जास्त काळजी घ्यावी लागते. कारण, एखादी धोकादायक वस्तू उचलून तोंडात टाकणं सोप्प वाटतं. पण काहीवेळा हे मुलांच्या जीवावरही बेतू शकतं.
जर मुलाने नकळत नाणे, लोखंडी नट-बोल्ट, रबरच्या छोट्या वस्तू गिळले असेल तर तुम्ही लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण, या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास मुलाचा मृत्यूही होऊ शकतो. म्हणून कोणतंही कारण न देता.
अशा प्रसंगावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. नुकतेच, असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका 11 वर्षाच्या मुलाने खेळत असताना लोखंडी चुंबक गिळला. त्याची शस्त्रक्रिया वेळेत झाली नसती तर त्याच्या जीवाला धोकाही होऊ शकत होता.
मुलांनी काही गिळले तर कसे ओळखावे?
आपल्या मुलाने काहीतरी गिळले आहे असे आपल्याला आढळल्यास, सर्वप्रथम या परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि घाबरू नका. अनेक पालकांना हे खूप उशिरा कळते कारण त्यांनी आपल्या मुलांना कधीही काहीही गिळताना पाहिले नाही.
दोन किंवा तीन वर्षांच्या मुलाच्या बाबतीत अधिक त्रास होतो ज्याला त्याचे शब्द देखील नीट समजत नाहीत. जर पुढे दिलेली लक्षणे मुलामध्ये दिसली, तर तुमच्या मुलाने काहीतरी गिळले असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
मुलांनी काहीतरी गिळले आहे हे कसे ओळखावे
1 पोटात असह्य वेदना जाणवणे
2 छातीत दुखणे
3 घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे
4 श्वास घेण्यास त्रास होणे
5 अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होणे
6 उलट्या होणे
7 वारंवार खोकला येणे
8 बोलण्यात अडचण
9 मुलाच्या तोंडातून लाळ येणे (Parenting Tips)
अनेक वेळा, जेव्हा मुले मणी आणि नाणी यांसारख्या बिनविषारी वस्तू गिळतात तेव्हा त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा वस्तू गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये अडकतात, परंतु 24 तासांनंतर उलट्या होणे, लाळ येणे, न खाणे, छातीत दुखणे, खोकला, बोलण्यात अडचण अशी लक्षणे दिसू शकतात. याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुलाने काहीतरी गिळले तर काय करावे
जर तुमच्या मुलाला ताप, सर्दी आणि खोकला याशिवाय अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल, किंवा उलट्या होऊ लागल्या असतील, तसेच पोटात दुखत असेल, तर तुम्ही बालरोगतज्ञ किंवा प्राथमिक आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घेऊ शकता.
अनेक लहान मुले चुकून नाण्यांसारख्या वस्तू गिळतात, सहसा काही वस्तू पचनसंस्थेतून जातात आणि विष्ठेवाटे बाहेर येतात. परंतु अनेकवेळा या गोष्टी मुलांच्या पोटात अडकून राहते. जर नाणे किंवा रबरची वस्तू 2 ते 3 तासांच्या आत बाहेर पडली नाही तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे.
लहान मुलांकडेही लक्ष द्या
काहील वस्तू अन्न प्रणालीमध्ये किंवा पोटात अडकल्या तरी त्यांना बाहेर काढण्यासाठी एंडोस्कोपिक प्रक्रियेची आवश्यकता असते. बटणे, बॅटरी आणि चुंबक यासारख्या वस्तू एन्डोस्कोपीद्वारे शक्य तितक्या लवकर काढणे महत्त्वाचे आहे. अन्यथा अशा वस्तूंमुळे मुलांच्या पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकते. याशिवाय गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
अशा काही वस्तू आहेत ज्या त्वरित काढल्या पाहिजेत. अन्यथा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. बॅटरी, चुंबक आणि इतर प्रतिक्रियाशील पदार्थांपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू पोटात गेल्याने त्रास होऊ शकतो. तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टर ऑपरेशन किंवा एंडोस्कोपीद्वारे बाळाने गिळालेले पदार्थ काढून टाकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.