Blue Whale Game : मुलाने टेरेसवरून उडी मारल्यानंतर तुम्हाला कळेल की तो ब्लू व्हेल गेम खेळायचा, आधीच ही काळजी घ्या

Parenting Tips : पालक आणि शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मुलांना समजावताना तुम्ही त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारहाण करून ही गोष्ट सांगू नका. असे केल्याने मुलं अधिकच वात्रट होतील.
Blue Whale Game
Blue Whale Gameesakal
Updated on

Blue Whale Game :

ब्लू व्हेल गेम मुलांच्या जीवावर उठली आहे. नुकतेच या गेमच्या नादात एका शाळकरी मुलाने आत्महत्या केली आहे. त्यामुळेच सध्या मोबाईल सोशल मिडिया आणि गेमिंग पासून मुलांना दूर ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे.

ही जबाबदारी केवळ पालकांचीच नाही तर शाळेची सुद्धा आहे. कारण मुलं दिवसातील सहा-सात तास शाळेमध्ये असतात. त्यामुळे या मोबाईल आणि गेमिंग पासून कसे दूर राहतील हे पाहण्याचं कर्तव्य शिक्षकांचा सुद्धा आहे.

पालक आणि शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मुलांना समजावताना तुम्ही त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारहाण करून ही गोष्ट सांगू नका. असे केल्याने मुलं अधिकच वात्रट होतील. आणि ते तुम्हाला घाबरणं सोडून देतील. (Blue whale game side Effects)

Blue Whale Game
Lolita Killer Whale : अबब, २२६८ किलोची Lolita होणार स्वतंत्र, आता समुद्रात करणार शिकार

मानसिक रोग तज्ञ संजीव त्यागी यांनी सांगितलं की मुले एकटी असणं, आत्मविश्वास नसणं, समाजाकडून शाळेकडून सतत नकारात्मक प्रतिक्रिया मुलांना मिळणं हे त्यांना सतत मोबाईल आणि गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

त्यामुळेच शाळेत अभ्यासात कमी असणारी, पालकांसोबत जास्त न मिसळणारे, मित्रांच्यातही मिक्स न होणाऱ्या मुलांना अधिक काळजी घेण्याची गरज असते. जी मुलं दिवसा अस्वस्थ असतात आणि रात्री मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असतात. अशा मुलांची अधिक काळजी घ्यावी लागते.

Blue Whale Game
Whale Fish : व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधींची किंमत का? जाणून घ्या..

काय आहे ब्लू व्हेल गेम?

ही एक अशी गेम आहे जी मुलांना ती खेळण्यासाठी प्रोत्साहित करते. मुलं जेव्हा ती गेम खेळू लागतात तेव्हा ती त्यामध्ये गुंतू लागतात. मुलांच्या स्वभावात देखील बदल होतो. ती शांत राहू लागतात आणि एकटी राहू लागतात. गेमचा शेवट होईल तसं शेवटचा टास्क हा इमारतीवरून उडी मारणे हा आहे. त्यामुळे मुलं ह्या गेमचा शिकार होत आहेत. त्याचा नुकताच एक बळी पुण्यात गेला आहे. 

या गेममध्ये जितकी टास्क दिलेले असतात ते पूर्ण करून त्याचे व्हिडिओ फोटो अपलोड करावे लागतात. हे फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही व्हेल होता आणि तुम्हाला जास्त मार्क मिळतात. असे सांगितले जात आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • या गेमबाबत मुलांनी जर तुमच्याकडे विचारण्यात केली तर तुम्ही त्यांना सर्व माहिती द्या.

  • मुलांसाठी ही गेम कशी हानिकारक आहे हे सांगा.

  • तुमची मुलं इंटरनेटवर काय पाहतायत काय करतायेत हे पहा.

  • मुले एकटीच बसायला लागली रात्रीचा जागरण करायला लागली तर त्यांच्याकडे लक्ष द्या.

  • मुलांच्या दिवसभराच्या रूटीनमध्ये जर फरक पडला तरीही काळजीच कारण असू शकतं.

Blue Whale Game
Blue Whale Game : कोणी बनवला ब्लू व्हेल गेम? या सायकोला तुरुंगात यायचे हजारो लव्ह लेटर्स, काय होतं प्रकरण?

पालकांनो हे लक्षात घ्या

तुमच्या मुलाची झोप पूर्ण होत नसेल. तर तो नक्कीच रात्री जागरण करत असेल. अशावेळी काळजीचं कारण असू शकते.

मुल दिवसभर मोबाईलला चिटकून बसले असतील किंवा टीव्हीवर हॉरर पिक्चर बघत असतील. तसेच, पहाटे उठून भितीदायक व्हिडिओ बघत असतील. किंवा ते हातावर कापून घेत असतील. त्याचे फोटो शेअर करत असतील तर ही धोक्याची घंटा असू शकते.

कारण, या गेममध्ये स्वत:ला इजा करून घ्या आणि त्याचे फोटो अपलोड करा. असे स्पष्ट सांगण्यात येतं. त्यामुळे मुलं अशी काही प्रयोग करत आहेत का याकडे सुद्धा लक्ष द्या.

Blue Whale Game
Blue Whale Game : व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला अन्.. ऑनलाइन गेममुळे जीव देणाऱ्या मुलाच्या आईने सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं ?

इंदापूरममधल्या एका इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांनी सांगितलं की, ब्लू व्हेल गेम मुलांपासून दूर ठेवण्यासाठी शाळेतील मुलांचे कौन्सिलिंग केले जात आहे. तर काही विद्यार्थी चोरूनही गेम खेळत असतील तर अशांवर लक्ष देण्यासाठी काही पालाकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळेने राबवलेल्या या सेशनमध्ये किंवा मुलांचाच नाही तर पालकांचे सुद्धा कौन्सलिंग केलं जात आहे. मुलांचे कशी काळजी घेतली पाहिजे असे सांगितले जात आहे अशी माहिती प्राचार्य रेणू श्रीवास्तव यांनी सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.