Parenting Tips : मुलांनी मोबाईल सोडावा म्हणून तुम्ही मेहनत घेणं गरजेचं? ; पण नेमकं काय करायचं

तुमची कामं होत नाहीत म्हणून मुलांना मोबाईल देणं कितपत योग्य?
Parenting Tips
Parenting Tipsesakal
Updated on

Parenting Tips : लहान मुलांच्या सवयी घालवणं म्हणजे अगदीच अशक्य काम. कारण, जितकं अवघड त्यांना चांगल्या सवयी लावणं असतं त्याहुन जास्त अवघड वाईट सवयी सोडवणं असतं. अशाच एका सवयीचा त्रास सध्या सगळ्याच पालकांना होतोय. तो म्हणजे मुलांना लागलेले मोबाईलचे व्यसन सोडवणे.

कोरोना काळात मुलांनी ऑनलाइन अभ्यासासाठी घेतलेला स्मार्टफोन मुलांची गरज बनला. आणि नंतर तो त्यांच व्यसन झाला. यामुळेच मुले अभ्यास असूनही मोबाईलच्या व्यसनाकडे झपाट्याने जात आहेत. शाळांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू झाले असले तरी मुलांचे फोनचे व्यसन काही कमी झालेले नाही. ही बाब पालकांसाठी चिंताजनक आहे.

Parenting Tips
Parenting Tips: पालकांनो, ‘पंचसूत्री’ पाळा! तुमची मुले आनंदी पण राहतील अन्‌ आवडीने अभ्यासही करतील

मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे मुले नवनवीन आजारांना बळी पडत आहेत. फोनचे व्यसन इतके वाढले आहे की मुले आक्रमक होत आहेत. त्याचबरोबर डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही सवय मुलांपासून दूर करायची असेल तर या टिप्स फॉलो करा.

बोलत रहा

सर्वात आधी तर मुलांशी संभाषण करणे गरजेचे आहे. तुम्ही कामात असता तेव्हा मुलं टीव्ही फोनमध्ये असतात. आणि तुम्ही रिकामे झालात की तुम्ही स्वत: मोबाईल घेऊन बसता. त्यामुळे खरंतर मुलांकडून मोबाईल जास्त वापरला जातो.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांनो मुलांना मारू नका, भविष्यात मुले होतील...
काहीवेळा पालकांच मोबाईलच वेडं सोडवणं कठीण असतं
काहीवेळा पालकांच मोबाईलच वेडं सोडवणं कठीण असतंesakal

वेळ द्या

मुलांशी केवळ बोलून समस्या सुटणार नाही. मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवणंही तितकच गरजेच असतं. नातं सांभाळताना, नवरा बायको एकमेकांना वेळ देतात. पण, मुंलांना जबाबदारी म्हणून ट्रिट करताना त्यांना सांभाळून घेणं राहून जातं.

प्रोत्साहन द्या

मुलांना नवीन गोष्टी शिकवा. जर मुलाला नृत्य किंवा चित्रकला आवडत असेल तर त्याला शिकण्यासाठी क्लास लावा. मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन द्या.

Parenting Tips
Parenting Tips : वयात आलेल्या मुलांना मनी सेव्हिंगची सवय लावा, पण कशी ते वाचा!

नियम

मुलांकडून एकदमच मोबाईल काढून घेऊ नका. कारण तसं करणं  मुलांना पटणार नाही. यासाठी मोबाईल किती वेळ वापरावा याचे काही नियम त्यांना सांगा. हळूहळू ते या सवयीतूम मुक्त होतील.

स्वत:ची कामं मॅनेज करा

अनेक पालक त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात. मुलांना त्यांची कामे करता यावीत म्हणून तो स्वतः त्यांना फोन देतो. इथेच ही सवय मुलांना बिघडवते. अशा परिस्थितीत पालकांनी आधी स्वतःमध्ये काही बदल करायला हवेत. मुलांना फोन न देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांच्या ओठांवर चुंबन घेणे योग्य की अयोग्य?
मुलांनाी मित्रांसोबत खेळणं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं
मुलांनाी मित्रांसोबत खेळणं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतंesakal

मुलांनी मोबाईल दूर ठेवावा म्हणून पालकांनी हे करावं

  • घरात प्रत्येक खोलीत टीव्ही नसावा

  • मुलांबरोबर त्यांच्या आवडीच्या विषयावर गप्पा माराव्यात

  • आज्जी आजोबा जास्त वेळ टीव्ही बघत असतील तर त्याची कारणे मुलांना समजावून सांगावीत

  • मुलांच्या खेळण्यासाठी महागड्या खेळण्यापेक्षा कल्पकतेतून आलेली खेळणी जास्त आकर्षक ठरतात

  • आई बाबांच्या कडेवर किंवा हाताला धरून चालणाऱ्या मुलांशी ते बोलत नसतात तर मोबाईल फोनवर बोलत अगर खेळत असतात

  • फोनचा वा टीव्हीचा उपयोग मुलांना एक जागी चुपचाप बसवून ठेवण्याचे साधन पाहु नका.

  • मुलांचे मित्र घरी बोलवा, त्यांच्यासोबत त्यांना खेळूदेत. तर ते जास्त वेळ मोबाईल पासून दूर राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.