Parenting Tips : मुलांना आदर्श व्यक्ती बनवायचं असेल तर या गोष्टी त्यांना नक्की सांगा!

बाबा म्हणतो, स्वत:च्या नजरेत चांगला माणूस बना
Parenting Tips
Parenting Tips esakal
Updated on

Parenting Tips :  बाबावर लागलेलं कोणतंही गाणं कानावर पडलं की प्रत्येकाला बाबा आठवतो. मुलाला शाळेत जाण्यासाठी सक्ती करणारा बाबा नकोसा वाटतो. पण, लहानपणापासूनच मुलांच्या मनात वडिलांची प्रतिमा भितीदायक असते. आईशी कितीही मोकळेपणाने बोलता येतं, पण वडिलांशी बोलताना घाम फुटतो.काही लोकांमध्ये तर स्वत:ला पोरं झाली तरी वडिलांचा धाक असतो.  

सध्याच्या पालक मुलांशी जास्त सक्तीचे वागत नाहीत. याला कारणीभूत आहे मुलांचे हट्ट आणि त्यांचा स्वभाव. अनेकदा वडिलांच्या आठवणी सांगताना, तुम्ही मुलांना म्हणाला असाल की, तुझ्या आजोबांच्या गाडीचा आवाज ऐकला की आम्ही भितीने अभ्यासाला बसायचो.

मुलांना तुम्ही काही सल्ले देत असाल. ते त्यांच्या किती कामी येतील की नाही माहिती नाहीत. पण,तुमच्या वडिलांनी दिलेले काही सल्ले तुम्हाला आता नक्कीच आठवत असतील. तुम्हालाही तुमच्या मुलाला आदर्श व्यक्ती बनवायचं असेल तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेले हे सल्ले नक्की त्यांना सांगा. (Parenting tips in marathi)     

Parenting Tips
Parenting Tips: मुलांचं संगोपन करताना 'या' चुका टाळाव्यात; नाहीतर मुलं होतील हट्टी

लहानपणी बाबाचा ओरडा ऐकून चिडणारे, आता अजय अतूलचे ‘बाप उमगायाचा नाही रं’ हे गाणं ऐकून रडतात. बाबांनी तुम्हाला आपल्याला दिलेले सल्लेल कसे कामी येतात हे पाहुयात.

बाबा म्हणतो, स्वत:च्या नजरेत चांगला माणूस बना

प्रत्येक बाप आपल्या मुलाला नक्की समजावून सांगतो की सर्वप्रथम त्याने आपल्या आयुष्यात एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर त्यांची सर्व कामे आपोआप सुरळीत होतील. पण मुलांना समजत नसल्यामुळे वडिलांच्या अशा बोलण्याने ते अनेकदा चिडतात. मात्र, मुलं मोठी होताच जबाबदार होतात, वडिलांच्या या विधानाचा अर्थ त्यांना स्वत:च समजतो.

बाबा म्हणतो, आयुष्यात चुकीचा मार्ग कितीही सोपा असला तरी तो निवडू नका

प्रत्येक व्यक्तीला आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण व्हावे असे वाटते, मग ते पूर्ण करण्यासाठी त्याला कोणताही मार्ग ठरवावा लागला तरीही. पण वडिलांचा चुकीचा उपाय न करण्याचा सल्ला त्यावेळी तुम्हाला वाईट वाटेल, पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि त्याचा अर्थ समजून घ्याल तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही अधिक वाढतील. (Parenting Tips

Parenting Tips
Parenting Tips: मुलांना घरी एकटं सोडताय? लक्षात ठेवा या गोष्टी, येणार नाही कोणतीही अडचण

बापमाणूस म्हणतो की, तुम्ही मनापासून केलेली मेहनत कधीच वाया जात नाही

लहानपणी जेव्हा मुलं जास्त वेळ झोपतात तेव्हा वडील त्यांना लवकर उठण्याचा सल्ला देऊ लागतात. झोपमोड झाली म्हणून अनेक मुलांना राग येऊ शकतो. पण मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते हेही खरे. जीवनात काहीतरी साध्य करण्यासाठी वेळेचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे.

वडिलधारे म्हणतात की, पांघरूण घालण्याचा प्रयत्न करू नका

चूक दाबणे किंवा दुसऱ्यावर टाकणे योग्य नाही. आपली चूक मान्य करून कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. याउलट, आपली चूक मान्य करून, आपण भविष्यात काय करणे टाळले पाहिजे हे लक्षात येते.

बाबा सांगायचे, तुमच्या क्षमतेवर कधीही शंका घेऊ नका, स्वत:वर विश्वास ठेवा

तुमच्यापेक्षा तुमच्या क्षमतेवर जास्त विश्वास असणारा जगात कोणी असेल तर ते तुमचे वडील आहेत. प्रत्येक वडील आपल्या मुलाला नेहमी सांगतात की त्याने स्वतःच्या क्षमतेवर कधीही शंका घेऊ नये. विद्यार्थीदशेत वडिलांच्या या म्हणीचा तुम्हाला काही अर्थ नसला तरी कठीण जगाला सामोरे जाताच प्रत्येक मुलाला वडिलांच्या म्हणीचा अर्थ कळू लागतो. (Bes advice for child)

Parenting Tips
Parenting Tips: तुमचे मुलं पहिल्यांदाच शाळेत जात आहे? पालकांनो मग या गोष्टी नक्की ठेवा लक्षात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.