Parenting Tips : लहानग्यांनाही जडलंय मोबाईलचं व्यसन? ओरडून नाही तर या ट्रिक वापरून सोडवा मुलांची सवय!

smartphone addiction in children: मुलांना पालकांच्या प्रेमाची आणि काळजीची सर्वात जास्त गरज असते
smartphone addiction in children
smartphone addiction in childrenesakal
Updated on

Parenting Tips : जर तुमचे मूलही अनेकदा मोबाईलला चिकटलेले असेल तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. वास्तविक, मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलासाठी घातक ठरू शकतो. डॉक्टरांच्या मते, हल्ली मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्य, निद्रानाश आणि चिडचिड यासारख्या मानसिक समस्या वाढत आहेत.

याशिवाय मोबाइलच्या व्यसनामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, भूक न लागणे, दृष्टी कमी होणे, डोळे दुखणे, मान दुखणे असे शारीरिक आजारही होत आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलांना या त्रासांपासून दूर ठेवायचे असेल तर या 8 पद्धतींचा अवलंब करून तुम्ही त्यांना मोबाईलपासून दूर ठेवू शकता.

smartphone addiction in children
Parenting Tips : मुलं उलट बोलायला लागली आहेत?; स्वत:मध्ये करा हा बदल

ओरडू नका

मुलांना पालकांच्या प्रेमाची आणि काळजीची सर्वात जास्त गरज असते. अशा परिस्थितीत तुम्ही मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवणे गरजेचे आहे, त्यामुळे तुमचे मूल हळूहळू मोबाईल वापरणे बंद करेल.

मुलांची मदत घ्या

मोकळ्या वेळेत मुलाच्या क्षमतेनुसार, घरातील कामात त्याची मदत घ्या, यामुळे मूल स्वावलंबी होईल आणि काही व्यावहारिक गोष्टी देखील शिकेल. छंदानुसार मूल चित्रकला, नृत्य, संगीत आणि इतर वर्गात सहभागी होऊ शकते.

smartphone addiction in children
Parenting Tips : वयात येणाऱ्या मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना सुधारता येत नाही!

मुलांना निसर्गात रमवा

मुलाला निसर्गाकडे आकर्षित करा आणि मैदानी खेळांसाठी देखील प्रोत्साहित करू शकता. तुमच्या मुलाला अशी कामे देत राहा, ज्यामुळे त्याची सर्जनशील क्षमता विकसित होईल. मोबाईल ऐवजी पाळीव प्राणी घरात आणा.

जेणेकरून मुल एकमेकांशी संवाद साधण्यास आणि भावना व्यक्त करण्यास शिकू शकेल. जर तुमचे मूल खूप हट्टी असेल आणि ते सहजासहजी हार मानत नसेल तर तुम्ही अॅपच्या मदतीने त्याच्या मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता.

Cracked Screen Pranked

Google Play Store वर Cracked Screen Pranked अॅप डाउनलोड करा. या अॅपमध्ये स्क्रीन क्रॅक होण्याची वेळ सेट करा. यामुळे तुमच्या मोबाईलची स्क्रीन क्रॅक दिसेल आणि मुल ती टाकेल. याशिवाय मुलांसमोर मोबाईलचा जास्त वापर करू नये.

पालकांनीच मोबाईलपासून दूर रहावे

खरं तर, जेव्हा मुले पाहतात की बहुतेक वेळा त्यांचे पालक मोबाइलमध्ये मग्न असतात, तेव्हा त्यांना वाटते की मोबाइल हे कदाचित मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे, म्हणून ते देखील मोबाइलमध्ये हरवू लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()