Parenting Tips : आजकालच्या मुलांना स्वत:ची कामे स्वत: करता येत नाहीत. ती स्वावलंबी नाहीत अशी री प्रत्येक घरात ओढली जाते. त्यांना हुशार किंवा परिपूर्ण बनवण्याचे कोणतेही सूत्र नाही. त्यामुळे मुलांना सवयी लावायच्या कशा हा मोठा प्रश्न पालकांसमोर पडलेला असतो.
मुलं पालकांकडूनच सर्वकाही शिकतात. पालकांकडे पाहून, त्यांनी केलेली गोष्ट पुन्हा करून ते अनेक गोष्टी आत्मसात करतात. मुलांना तुमच्यावर अवलंबुन न राहता चांगल्या व्यक्तीसारखे स्वावलंबी व्हावे, असे वाटत असेल. तर त्याला लहानपणापासूनच काही गोष्टी करायला शिकवा.
ज्यामुळे ते आपल्या मनाचा पुरेपूर आणि योग्य वापर करू शकेल. लहानपणी शिकवलेल्या या सवयी मुलाला भविष्यात यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत करतात. मुलं दीड वर्षांची असल्यापासून तुमच्या सूचना त्यांना समजायला लागतात.
अशावेळी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करायला लावून त्यांच्या मेंदूचा अधिक चांगला विकास करता येतो. जसे की जेवणाची ताटे घेण्यास मदत करणे, स्वयंपाकघरातील किरकोळ कामे करणे. पाणी स्वत: पाणी घेणे, इतरांना आणून देणे अशी कामे तुम्ही बाळाला लावू शकता.
दोन वर्षांच्या मुलांना ही कामे नक्की लावा
मुलं अजून लहान आहे, त्यांना काम कशाला लावायचे, असे अनेक लोक तुम्हाला बोलतील. पण थोडा विचार करा, तुम्ही या वयात मुलांना जे काही सांगाल ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहतं. त्यामुळं शाळेची तयारी करताना, कपडे, मोजे आणि शूज घालणे या सर्व गोष्टी स्वत:च करायला सांगा. यामुळे मुले स्वावलंबी होतात.
मुलांना एकट्याने खेळूद्यात
बाळाची काळजी प्रत्येकाला असते. त्यामुळे बाळ पडेल, रडेल म्हणून त्याला एकटं सोडलं जात नाही. पण, लक्षात घ्या, या वयापासूनच मुलं एकट्याने खेळायला, मित्रांच्या घरी जायला, दुकानात जायला शिकलीत तर ते त्यांना धाडसी बनवतं.
खेळताना पडलं तर पडूदेत पण त्यानंतर तो स्वत:च उठेल, त्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. उठ, काही लागलं नाहीय, चल पुन्हा खेळ असे म्हटलात तर त्याला त्या लागलेल्या गोष्टींच काही वाटणार नाही. पण तुम्ही स्वत:च पडलेल्याचा बाऊ केलात तर तो जास्त रडेल आणि पडेन या भितीने खेळायलाही जाणार नाही. (Parenting Tips)
मुलांना भूतदया शिकवा
मुलांना केवळ खेळ खाणं इतक्यापुरतं मर्यादित न ठेवता. त्यांची सामाजिक बांधिलकी जपायला शिकवा. रस्त्यावरील एखाद्या कुत्र्याला खायला देणं, त्याला हात लावणं हेही त्यांला करूद्यात. तसेच, काही पुस्तकं, गोष्टी यांतून सामाजिक गोष्टी शिकवा. ज्यामुळे एखाद्याची मदत करणं मुलांना सहज जमेल.
मुलांनाही प्रश्न विचारू द्यात
तुम्ही बाळासमोर खेळणी टाकली अन् त्याला खेळ म्हटलं तर तो थोड्याच वेळात कंटाळतो. तुम्ही काय करत आहात, त्या कामात तो तुम्हाला मदत करायला येतो. कोणतंही काम करताना मुलांना प्रश्न विचारा. त्यांनीही तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत, असे सांगा.
मुलं काहीतरी विचार करून स्वत:च प्रश्न विचारायला लागले की त्याला उत्तर द्या. कधीकधी वाटेल की बाळाचे प्रश्न संपतच नाहीत. पण तो प्रश्न विचारतो यातून तो बऱ्याच गोष्टी शिकतो हे लक्षात घ्या.
मुलांना विचार करू द्या
मूल काही काळ एकांतात बसले असेल तर त्याला विचार करू द्या. यामुळे मूल काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्याचा विचार करेल. आणि त्यांची साधी खेळणी नव्या पद्धतीने खेळायला त्यांना हरकत असेल. या कामामुळे मुलांच्या मेंदूचे कौशल्य विकसित होते.
प्रत्येकाला कशाची तरी आवड असते. तुमच्या मुलांमध्ये असलेली ती आवड ओळखा आणि त्याला प्रोत्साहन द्या. आपल्या मुलास गाणी ऐकण्याची आणि डान्स करण्याची सवय लावा. यामुळे मुलाचा मूड फ्रेश होईल आणि मुलामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा निर्माण होईल.
मुलांचे रूटीन फिक्स करा
मुलाची झोपणे, उठणे, आंघोळ करणे, खाणे, अभ्यास करणे इत्यादीसाठी वेळ निश्चित करा. यामुळे मुलांना त्यांच्या वेळेची आणि कामाची जाणीव होईल आणि ते तुमच्यावर अवलंबून राहणार नाहीत. या कामामुळे मुलांना स्वावलंबी बनवण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.