Twin baby care tips: लहान मुलं घरात असेल तर संपूर्ण कुटुंब त्याच्या काळजीत गुंतलेलं असतं. एक मुलं सांभाळण नव्यानेच आई झालेल्या स्त्रीसाठी तसं अवघड काम असतं.
म्हणून तिच्यासोबत घरातील मोठ्या जाणकार स्त्रीया असतात. पण हिच काळजी जर एकाचवेळी दोन मुलांची म्हणजेच जुळ्या मुलांची घ्यावी लागत असेल तर पालकांना टेन्शनच येतं.
जुळ्या बाळांना एकत्र सांभाळणे हे खूप अवघड काम आहे. विशेषत: जे संयुक्त कुटुंबात राहत नाहीत त्यांच्यासाठी. वास्तविक, जुळ्या बाळाकडे सर्व वेळ लक्ष द्यावे लागते. त्यांचे खाणे, पिणे, आंघोळ, झोपणे या सर्व गोष्टींची वेळेवर काळजी घ्यावी लागते, जी प्रत्येकासाठी सोपी नसते.
जुळी मुले असलेल्या जोडप्यांची जबाबदारीही दुप्पट असते. दोन्ही मुलांची समान काळजी घेणे तसेच दोघांच्या आरोग्याकडे समान लक्ष देत असताना अनेक वेळा पालकांकडून काही चुका होतात. या चुकांमुळे मुलांचे संगोपन तर बिघडतेच, पण चुकीच्या संगोपनामुळे त्यांच्या वागणुकीवरही परिणाम होतो.
पुढे जाऊन या चुका मुलांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल घडवून आणू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला जुळ्या मुलांच्या आरोग्य आणि संगोपनाशी संबंधित अशा चुका सांगणार आहोत, ज्या तुम्ही चुकूनही पुन्हा करू नका.
लाईफस्टाईल सेट करा
जेव्हा तुम्हाला जुळी मुले असतील तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्यासाठी दिनक्रम सेट करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत मुलांचे खाणे, पिणे, आंघोळ आणि झोपणे यांचा दिनक्रम तुम्ही अगोदरच ठरवावा.
त्यामुळे मुलांच्या खाण्याची, झोपण्याची आणि उठण्याची वेळ तुम्हाला कळेल आणि उरलेली कामे तुम्ही सहजतेने करू शकाल. ट्विन फीडिंग पिलोचा वापर बाळांना खायला घालण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
कुटुंबाची मदत घ्या
न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहून जुळ्या मुलांचे संगोपन करणे कठीण काम असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घेऊ शकता. यासोबतच, जर तुम्हाला हवं असेल तर मुलांची काळजी घेण्यासाठी बेबी सिटर ठेवणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
ब्रेक घेणे महत्वाचे आहे
जुळ्या मुलांची काळजी घेत असताना अनेक पालकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. यामुळे तुम्हाला थकवा आणि तणाव जाणवू लागतो आणि तुम्ही चिडचिडही होऊ शकता. अशा परिस्थितीत स्वतःसाठीही थोडा वेळ काढा.
ज्यामुळे तुम्ही लोकांना ताजेतवाने वाटेल आणि मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकाल. त्यामुळे एकाने मुलांची जबाबदारी घेतली तर दुसऱ्याला आराम करता येईल. त्यामुळे वेळ ठरवून मुलांची जबाबदारी घ्या.
सोशल मीडियाची मदत घ्या
जुळ्या मुलांची चांगली काळजी घेण्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असल्यास. त्यामुळे तुम्ही यासाठी सोशल मीडियाची मदत घेऊ शकता.
त्यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनुभवी माता आणि वडिलांचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवू शकता आणि चाइल्ड केअर टिप्स घेऊ शकता. तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या ग्रुपवरूनही तुम्हाला मदत मिळू शकेल.
मुलांची काळजी कशी घ्याल
अनेकदा पालक जुळ्या मुलांना एकाच बाटलीने दूध देतात. एकाल प्लेटमध्ये खायला देतात किंवा मुलांना एकमेकांचे कपडे घालायला लावतात. पण असे करणे योग्य नाही. यामुळे मुलाच्या शरीरात संसर्ग होऊ शकतो.
मुलांची तुलना करू नका- जुळ्या मुलांमध्ये एका मुलाची अधिक प्रगती होते तर दुसऱ्याची उशीरा होते. त्यामुळे त्या दोघांची तुलना करू नका.
गोष्टी समजून घ्या- एकाचवेळी दोन मुलं सांभाळणं तसं कठीण असलं तरीही हे अशक्य नाहीय. कारण या दोघांच्या गरजा, भुकेच्या वेळा आणि इतर तक्रारी सारख्याच असणार आहेत. त्यामुळे त्या नीट समजून घ्या.
जुळ्या बाळाची शारीरिक स्वच्छता – लहान मुलांच्या अंघोळीसाठी तुम्ही आया ठेऊ शकता. कारण नुकतेच डिलिव्हरीतून उठलेल्या तुम्हाला ते करणं शक्य नाही. त्यामुळे आयाच्या मदतीने तुम्ही बाळाची मालिश, स्वच्छता त्यांची इतर काळजी घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.