Parenting Tips : दोन, अडीच की तीन, लहान मुलांना प्ले ग्रूपला घालण्याचे योग्य वय कोणतं?

मुलांच्या शाळेची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Parenting Tips
Parenting Tips esakal
Updated on

Parenting Tips :

मुलांसाठी प्ले स्कूल सुरू करण्यासाठी योग्य वय ठरवणे हा प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. लहान मुलांसाठी प्राथमिक शिक्षण चांगले असलेल्या प्ले स्कूल निवडणे गरजेचे असते. कारण, शाळेत जाण्याचा पहिले पाऊल हे प्ले स्कूलमध्ये पडते. शाळा मुलांना घराबाहेरील वेगळ्या वातावरणाची ओळख करून देतात.

मुलांमधील या बदलासाठी योग्य वेळ निवडणे पालकांसाठी थोडे कठीण आहे. हे ठरवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या वयात मुलांना फारशी समज नसते. त्यामुळेच पालकांनी शाळेच्या ऍडमिशनचा निर्णय घेण्याआधी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळेच, मुलांना शाळेत घालण्याचं योग्य वय कोणतं याबद्दल जाणून घेऊयात.

Parenting Tips
Teenage Parenting : किशोरवयीन मुलांना तंत्रज्ञान, समाजमाध्यमं आणि त्यांचे धोके याविषयी बऱ्यापैकी माहिती; अभ्यासातून बाब समोर

आजकाल लहान मुलांमध्येही स्पर्धा केली जाते. आमचा हा हुशार आहे, गल्लीतला तो त्याला अजून काहीच कळत नाही. वय तर सेम असतात पण प्रत्येकाचा बुध्यांक कमी जास्त असू शकतो. पण शेजारच्या मुलाला शाळेत घातलं म्हणजे आपल्या २ वर्षाच्या बाळालाही नेऊन बसवावं असा विचार पालक करतात. पण हे चुकीचे आहे.

मुलांना प्ले ग्रूपला पाठवण्याचे योग्य वय कोणते?

मुलांसाठी प्ले स्कूल सुरू करण्यासाठी योग्य वय साधारणपणे 2 ते 3 वर्षे मानले जाते. या वयातील मुले बाह्य ज्ञान प्राप्त करण्यास तयार होतात. हे वयही अनेक गोष्टींचा विचार करून ठरवले जाते.

मुलांच्या बुद्धीचा विकास 2 ते 3 वर्षांच्या वयात होतो

तज्ञ म्हणतात की 2 ते 3 वर्षांच्या मुलामध्ये सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक कौशल्ये विकसित होऊ लागतात. हेच कारण आहे की या वयात मुले प्ले स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि तेथे काहीतरी शिकण्यासाठी पूर्णपणे तयार असतात.

या वयात मुले सामाजिक संपर्क साधण्यास सक्षम होतात

या वयातील मुले त्यांच्या समवयस्कांशी संवाद साधण्यात स्वारस्य दाखवू लागतात. ज्यामुळे त्यांची सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत त्यांना प्ले स्कूलमध्ये पाठवण्यासाठी 2 ते 3 वर्षे वयोगट योग्य आहे.

Parenting Tips
Parents Bonding with Child : आजच्या काळात पालकत्वाची शैली आणि सकारात्मक पालकत्व खूप महत्वाचे ; डॉ. मलिहा साबळे

मुले भाषेचे ज्ञान घेतात

मूल अनेकदा 3 वर्षांच्या वयापर्यंत भाषेचे ज्ञान प्राप्त करते. या वयात मुलांमध्ये काय, कधी आणि कसे बोलावे याचे ज्ञान विकसित होतात. अशा परिस्थितीत त्यांना प्ले स्कूलमध्ये पाठवल्यास त्यांची शब्दसंग्रह आणि संवाद क्षमता आणखी वाढू शकते.

मुलांना प्ले स्कूलला पाठवण्याचे फायदे

प्ले स्कूलद्वारे, मुलांना दैनंदिन रूटीन सुरू करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. ज्यामुळे त्यांना नंतर औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार केले जाते. जेणेकरून भविष्यात त्यांना शाळेत पाठवल्यावर त्यांची मानसिक तयारीही होईल.

Parenting Tips
T20 World Cup 2024: ऋषभ पंतला Playing-11मध्ये जागा मिळाल्यास 'या' दोन खेळाडूंचा पत्ता कट; जाणून घ्या टीम कॉम्बिनेशन

शाळेची निवड करताना

शाळा खात्रीशीर असेल अशीच निवडा. जी तुमच्या पाल्याची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकेल. कारण, शाळेची निवड चुकली तर तुमच्या पाल्याला अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. पाल्यांमध्ये न्यूनगंड तयार होऊ शकतो. जो त्यांच्या भविष्यावर परिणाम करणारा ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.