Parenting Tips : लहान मुल बोलायला कधी लागतं, कशी होते त्यांची बोलण्याची प्रोसेस?

तीन वर्षांनंतरही बाळ बोलत नसेल तर काय करावं?
Parenting Tips
Parenting Tips esakal
Updated on

Parenting Tips : घरात लहान मुलं आलं की त्याच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक केलं जातं. मुलाचं पालथ होणं, त्याने तुमच्याकडे पाहुन हसणं, बाळाची अंघोळ, त्याचे रांगणं, चालणं, बोलणं या सगळ्याचीच घरचे लोक वाट पाहत असतात.

मुले बोबड्या भाषेत बोलू लागली की त्यांना पाहून आई-वडील आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. बाळ जसजसे मोठे होत जाते तस तसे आई वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक होतात. मुलाचे बोबडे बोल त्यांना एक वेगळाच आनंद देतात.

सहसा मुले एक वर्षानंतर हळूहळू बोलायला सुरुवात करतात. स्पष्ट नसले बोलत तरी कानावर सततचे शब्द पडल्याने आणि आपल्या ओठांच्या हालचाली ओळखून ते बोलण्याचा प्रयत्न करतात. (Parenting Tips : When children start speaking how to help children to speak)

Parenting Tips
Baby Care Tips : सावधान! लहान बाळांची घ्या काळजी अन्यथा...

डॉ.हिमानी नरुला, डेव्हलपमेंटल बिहेवियरल बालरोगतज्ञ आणि कॉन्टिनुआ किड्सच्या सह-संस्थापक आणि संचालक, म्हणतात की मुलाला बोलायला शिकण्यासाठी एक कालमर्यादा असते. त्या सांगतात की, १२ महिन्याचं बाळ काका, पप्पा, बाबा असे दोन दोन अक्षरं असलेले शब्द बोलतात.

डॉ. हिमानी सांगतात की 18 महिन्यांचे मूल 5 ते 6 अर्थपूर्ण शब्द बोलतात. यामध्ये त्यांच्या सभोवतालचे शब्द समाविष्ट आहेत, जे ते त्यांच्या वातावरणातून शिकतात. दोन वर्षांच्या वयापर्यंत मुलांकडे 200 शब्दांचा शब्दसंग्रह असतो.

या वयात ते दोन शब्द मिसळून बोलू लागतात. त्यात ते पाणी दे असं म्हणू लागतात. त्याच वेळी, तीन वर्षांचे असताना, मूल तीन शब्द वाक्ये बोलण्यास शिकते. यामध्ये, ते संज्ञा आणि सर्वनाम वापरण्यास शिकतात, उदाहरणार्थ, मुले सहसा तीन वर्षांच्या वयात पप्पा घरी या, आई जेवायला दे, आई भूक लागलीय अशी छोटी वाक्य म्हणू लागतात.(Parenting Tips)

Parenting Tips
Baby Care : मुलांच्या हेल्दी स्लीपिंग पॅटर्नसाठी फॉलो करा या टिप्स

डॉ.हिमानी सांगतात की, सध्या मुलं पटकन सोशल होऊ शकत नाहीयेत. चार चौघांची गर्दी घरी झाली की ते घाबरतात. एखाद्या कार्यक्रमात गेले तरी ते आईला चिटकून असतात. याचं कारण म्हणजे गर्दी त्यांच्या सवयीची नाही. सवयीने  घरात येणारी-जाणारी माणसं फार कमी झाली आहेत, त्यामुळे मुलांना टाटा बाय, बाय म्हणता येत नाही.

हे समजून घ्या की, जन्माच्या आधीपासूनच मुल गर्भात असताना आईने त्याच्याशी बोललेले सर्वकाही ऐकत असतं. जन्मापासून ते तीन महिने वयापर्यंत मूल त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे आवाज ओळखू लागते. तोही त्याच्या ओळखल्या गेलेल्या आवाजाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू लागते. (Baby care tips in marathi)

अशी सुरुवात करा

मूल स्वतःहून बोलू लागतं, पण त्यासाठी तुमचा संवाद आणि वातावरणही मोठी भूमिका बजावते. म्हणूनच प्रत्येक क्षणी बाळासोबत बोलत रहा. त्याला बोलण्यासाठी प्रोत्साहीत करा. तुम्ही एखादी गोष्ट बोलल्यानंतर बाळ काय रिऍक्ट करत याची वाट पहा. त्याने तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं तर त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहीत करा.

Parenting Tips
Baby Care Tips :तुमचं बाळही दर तासाला झोपेतून रडत उठतोय? तज्ज्ञांनी सांगितल कारण, नक्की वाचा

तीन वर्षांनंतरही बाळ बोलत नसेल तर

३ वर्षे उलटून गेली तरी हि मुले स्पष्ट बोलत नसतात किंवा कधीकधी बोलतच नाहीत. फार कमी वेळा तोंडातून शब्द काढतात. अशा स्थितीत या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि हि एक समस्या समजून त्याकडे गांभिर्यानेच पाहावे.

बाळ जर उशिरा बोलत असले वा त्याने अजूनही बोलणे सुरु केले नसेल तर त्याला स्पीच डिले असे म्हणतात. तुम्ही लक्ष दिलं असेल कि दोन महिन्यांपर्यंत बाळ चित्र विचित्र आवाज काढायला सुरुवात करते. मात्र अशाप्रकारे जर बाळ बोलत नसेल तर याला स्पीच डिलेचे सुरुवातीचे लक्षण मानले जाऊ शकते. (Baby Health Tips)

स्पीच डिलेची अनेक कारणे असू शकतात. सगळ्यात प्राथमिक कारण हे असू शकतं की त्याच्या तोंडात काही समस्या आहे. तोंड वा जीभेमध्ये काही समस्या असल्यास स्पीच डिले होऊ शकते. अजून एक कारण म्हणजे स्पीच एन्ड लेन्ग्वेज डिसोर्डर होय.

यामध्ये तीन वर्षाचे होऊनही बाळ जास्त शब्द बोलू शकत नाही. अशा स्थितीत त्याला स्पीच डिले समस्या झाल्याचे नाकारता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.