Parents Teacher Meeting Tips : लहान मुलांचे संगोपन लहानपणापासून व्यवस्थित झाले की, मुलांचा सर्वांगीण विकास सुलभ होण्यास मदत होते. शाळेत गेल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पाडले जातात. त्यामुळे, मुलांच्या संगोपनात पालक आणि शिक्षक यांचा मोठा वाटा असतो, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
मुलांचे यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्यात पालकांसोबत शिक्षक देखील महत्वाची भूमिका पार पाडतात. परंतु, अनेकदा शिक्षक आणि पालक काही चूका करतात ज्यामुळे मुले नकारात्मक होण्याची शक्यता बळावते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या गोष्टी पालकांनी पॅरेंट्स टीचर मीटिंगमध्ये (PTA) मुलांबद्दल बोलू नयेत.
अनेकदा पालक मिटिंगमध्ये(पॅरेंट्स टीचर मीटिंग) आपल्या मुलांना शिक्षकांसमोर ओरडतात किंवा त्यांना दरडावतात. त्यामुळे, याचा मुलांवर अतिशय वाईट परिणाम होतो. सगळ्यांसमोर ओरडल्याने किंवा रागावल्याने मुलांना अतिशय दु:ख होतं. त्यानंतर, कदाचित मुले पालकांवर विश्वास ठेवणं बंद करू शकतात.
पालक अनेकदा टीचर पॅरेंट्स मिटिंगमध्ये उपस्थित राहिल्यानंतर मुलांच्या तक्रारी ऐकल्यानंतर लगेच चिडचिड सुरू करतात. त्यानंतर, मग मुलांना दोष देण्यास सुरूवात करतात. पालक मुलांना म्हणतात की, ते आयुष्यात काहीच करू शकणार नाहीत.
तू किंवी ती अयशस्वी होईल, तुमच्याकडून काहीही होणार नाही. या सर्व गोष्टी बोलून मुलांना दोष देण्यास सुरूवात करतात. या सगळ्याचा मुलांवर चुकीच्या पद्धतीने परिणाम होतो. त्यामुळे, मीटिंगमध्ये मुलांना लगेच दोष देऊ नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्व संवाद साधा.
पालक मीटिंगमध्ये शिक्षक मुलांच्या प्रगतीबद्दल बोलतात, त्यांच्या अभ्यासाबद्दल आणि वागणुकीबद्दल ही बोलतात. मुले-मुली काही चूका करत असतील तर त्या तक्रारींचा पाढा ही ते पालकांसमोर वाचू शकतात.
या मीटिंगमध्ये पालकांनी मुलांची शिक्षकांसमोर कधीच जास्त प्रशंसा करू नये. यामुळे, मुलांचा अतिआत्मविश्वास वाढून ते शाळेत खोडसाळपणा, चूका करणे सुरू करू शकतात. एवढचं नव्हे तर मुले त्या नादात आपल्या शिक्षकांच्या म्हणण्याला महत्व देत नाहीत आणि त्यांचा आदर राखत नाहीत. त्यामुळे, शिक्षकांसमोर मुलांची जास्त स्तुती करणे थांबवा.
अनेकदा पालक या मीटिंगमध्ये मूलांच्या जास्त चूका काढतात. पालकांनी शिक्षकांसमोर मुलांच्या या जास्त चूका काढल्यामुळे मूलांचा आत्मविश्वास ढळू शकतो. त्यामुळे, त्यांना समजून घ्या आणि मैत्रीपूर्वी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.