स्पेशल व्यक्तीला गिफ्ट म्हणून देताना आपण चांगल्या परफ्युमचा नक्की विचार करतो. कारण, परफ्यूम लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनला आहे. परफ्यूम शिवाय जगणं लोक इमॅजीन करू शकत नाहीत.
घामाच्या दुर्गंधीपासून बचाव करणारा परफ्यूम लोकांचा साथी बनला आहे. पण हा परफ्यूम साठवून कसा ठेवायचा हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे अनेक लोकांचे महागडे परफ्यूम लगेच खराब होतात आणि ते फेकून द्यावे लागतात. आज परफ्यूम डे आहे. त्यामुळेच आजच्या दिवशी परफ्यूम स्टोअर कसे करायचे याची माहिती घेऊयात.(Perfume Day : how to store perfume for long lasting fragrance)
- परफ्युमच्या बाटलीचे झाकण नेहमी व्यवस्थित बंद करा. त्यावर हवेतील ऑक्सिजनचा थर बाटलीत गेला तर परफ्यूम खराब होतो.
- परफ्यूमचा बॉक्स फेकू नका. हे बॉक्स विशेषत: परफ्यूमच्या चांगल्या राहण्यासाठी बनविलेले असतात.
- परफ्यूम वापरताना बाटली सतत शेक करू नका. त्यामुळे परफ्यूम खराब होतो.
- परफ्यूम लाईटपासून दूर ठेवा.लाईटमध्ये बाटली ठेवली असेल तर परफ्यूम लगेच खराब होतो.
- ड्रेसिंग टॉप्सप्रमाणे, बाथरूममध्ये, उंच कपाटात, खिडकीसमोर, परफ्यूम कधीही ठेवू नये. ते ठेवण्यासाठी योग्य जागा म्हणजे बेडरूम, ड्रेसिंग ड्रॉवरहोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.