Personality Development : स्टॅंडर्ड कपडे,शूज अन् महागडा परफ्युम नाही, तर या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीला बनवतात अधिक रूबाबदार

Personality Development Things : आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या केल्याने तुम्हाला मदत होईल. स्वत:चे व्यक्तीमत्व घडवण्यात तुम्हाला या गोष्टी नक्की फायदेशीर ठरतील.
Personality Development
Personality Development esakal
Updated on

 Personality Development :

आपण दिवसभरात किती लोकांना भेटतो.त्या लोकांमध्ये काही ओळखीचे असतात.तर काही अनोळखी. या सर्वांमध्ये आपण काही चेहरे नेहमी लक्षात ठेवतो. कारण ते लक्षात राहण्यासारखे चेहरे हे आकर्षक असतात.त्यांची स्टाईल आकर्षक असते. पण काहीवेळा आकर्षक कपडे अन् शूज या दिखाव्यापेक्षा काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात.

तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा रंग,तुमची उंची या गोष्टी तर तुम्ही बदलू शकत नाही. पण, तुम्ही केलेल्या काही गोष्टींमुळे तुमच्या व्यक्तीमत्वामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होईल.ज्यामुळे तुम्ही लोकांमध्ये चर्चेचा विषय बनाल.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या केल्याने तुम्हाला मदत होईल. स्वत:चे व्यक्तीमत्व घडवण्यात तुम्हाला या गोष्टी नक्की फायदेशीर ठरतील.

Personality Development
Personality Development: तुमच्या जीवनशैलीत या गोष्टींचा करा समावेश, नेहमी राहाल आनंदी!

स्वच्छतेची काळजी घ्या

असं म्हणतात की,ज्याचं मन सुंदर आहे त्याला बाह्य सुंदरतेची आवश्यकता नाही. मनातला साधेपणा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो.पण, आपल्या शरीराची स्वच्छताही आपल्या व्यक्तीमत्वाच्या सौंदर्यासाठी महत्त्वाची ठरते. व्यक्तिमत्व आकर्षक बनवायचे असेल तर तुम्ही स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

यामध्ये तुमचे नखे कापणे, केस वेळेवर कापणे,शरीराची स्वच्छता यासारख्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. ज्यामुळे तुम्ही संवाद कौशल्य सुधारण्यासाठी काम करू शकता.

Personality Development
Personality Development: तुम्हालाही आयुष्यात हरवल्यासारखं वाटतंय? मग या गोष्टी करून पाहा

तुमची बोलण्याची पद्धत

जेव्हा तुम्ही तुमचा मुद्दा रोखठोकपणे लोकांसमोर मांडता. तेव्हा लोक तुमचे नक्की ऐकतात. तुमच्या बोलण्यामुळेही लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. यामध्ये केवळ तुमचे शब्दच नाही तर चेहऱ्यावरील हावभावही महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत सुधारली पाहिजे,

यासाठी तुम्ही काही कम्युनिकेश कोर्सेस करू शकता. तसेच, आरशासमोर बसून तुम्ही बोलण्याची प्रॅक्टीस करू शकता.

Personality Development
Nashik Tribal Development : आदिवासी आश्रमशाळांतील वह्या खरेदीचा मार्ग खुला

ज्ञान वाढवा

तुम्ही इंजिनिअर,डॉक्टर असाल, किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल. तरी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सोडून इतर विषयांच नॉलेजही असायला हवे. त्यामुळे अवांतर वाचनासोबत तुम्ही काही गोष्टी इतरांकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय पुस्तके वाचणे, महत्त्वाच्या विषयांशी संबंधित काही माहिती मिळवणे आणि विशेषतः आपल्या कामाशी संबंधित नवीन गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहे.

Personality Development
Development works : येवल्यात 23 कोटीच्या विकासकामांना मंजुरी!

सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

जगभरात आयुष्य जगण्याचं एक सोप्प गणित सांगतिलं जातं. ते म्हणजे तुम्ही कितीही अडथळे आले तरी सकारात्मक रहा. सकारात्मक विचार करणे होय. प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून सर्वचजण दूर पळतात. त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहीलात.तर, तुमच्या जीवनात येणारे लोकही सकारात्मक राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.