Personality Test: काय सांगता, तुमच्या मोबाईल धरण्याच्या सवयीवरुनही कळतो स्वभाव...!

तुम्ही तुमचा मोबाईल कसा पकडतात यावरून तुमचा स्वभाव व्यक्त होत असतो, असं तज्ज्ञ सांगतात. जाणून घ्या.
Personality Guess using mobile phone
Personality Guess using mobile phone esakal
Updated on

Your Phone holding Habbit Tells Your Personality : तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमची फोन पकडण्याची सवय तुमचं व्यक्तीमत्व सांगू शकतं. त्यामुळे तुम्ही फोन कसं पकडतात ते ओळखा आणि त्यावरून तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.

Personality Guess
Personality Guessesakal

एकाच हातात फोन पकडणे

  • तुम्ही एकाच हाताने फोन पकडत असाल, अंगठा आणि बोटांनी फोन फीरवता का? याचा अर्थ तुम्ही बेफीकर, आनंदी आणि आत्मविश्वासी व्यक्ती आहात.

  • आयुष्यात कधी कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नाहीत. जे मिळेल ते स्वीकारण्याची तुमच्यात क्षमता आहे.

  • स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतो. येणाऱ्या नव्या संधीचा फायदा घेता येतो.

  • जर गरज भासली तर जोखिम पत्करू शकतात. आपले उद्दीष्ट प्राप्त करण्यासाठी कंफर्ट झोन बाहेर पडू शकतात.

  • जेव्हा रोमांस आणि प्रेमाचा विषय येतो तेव्हा गोष्टी हळूवार घेणे आणि सतर्क राहणे पसंत करतात.

Personality Guess using mobile phone
Best Phones under 5000: 5 हजारपेक्षा कमी किंमतीचा हा स्वस्त फोन तुम्हाला माहितेय का? फिचर्स पहाल तर शॉक व्हाल...
Personality Guess
Personality Guessesakal

दोन्ही हातांनी पकडून अंगठ्याचा वापर

  • जर तुम्ही फोन दोन्ही हाताने पकडून अंगठ्याचा वारपर करत असाल तर तुम्ही बुद्धीमान, सहज ज्ञान घेणारे आणि व्यवहारिक आहात.

  • इतरांविषयी मत बनवताना सहानुभूतीपूर्ण, केअरींग आणि बुद्धीमान आहात.

  • तुम्ही दगाफटक्यापासून सावध राहू शकतात. पण त्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवा.

  • या गुणांमुळे तुम्ही डेटिंग सहज करू शकतात.

  • जीवनात प्रेम मिळवल्यावर गोष्टी हळूवार घेऊ शकत नाहीत. पण घाई करणं अडचणीत नेणारं ठरू शकतं.

Personality Guess using mobile phone
Phone Use : झोपण्याच्या एक तास आधी का करू नये फोनचा वापर ?
Personality Guess
Personality Guessesakal

दोन्ही हातांनी पकडून दोन्ही अंगठ्यांचा वापर

  • परिस्थिती समजून घेण्यात फास्ट आहात. आणि आव्हाने छान हाताळतात.

  • गोष्टींना विरोध नाही करत.

  • गरजा, परिस्थिती हाताळणे जमते.

  • पार्टी आणि उत्सवांमध्ये एक आनंदी आणि उर्जावान व्यक्तीमत्व आहे.

  • जेव्हा तुम्ही तात्विक विषयांवर वाद घालतात तेव्हा गंभीर असतात. पण लहान मुलांमध्ये एकदम बिनधास्त आणि आनंदी असतात.

  • या गोष्टी तुमच्या विषयी प्रेमात पाडायला पुऱ्याशा आहेत.

  • पण रोमँटिक आयुष्यात मसाला टाकण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घेऊन समर्पणाचा परिचय द्यावा लागेल.

Personality Guess
Personality Guessesakal

एका हाताने फोन पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाचा वापर

  • जर तुम्ही या वर्गात असाल तर तुमच्या ज्वलंत कल्पना आणि मुलभूत विचारांनी लोक प्रभावित असतात.

  • जर तुम्ही चित्रकार किंवा लेखक बनू इच्छिता तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

  • बहिर्मुखी व्यक्तीमत्व असेल तरी स्वतःला सक्रिय करण्यासाठी तुम्हाला एकांत हवा असतो.

  • प्रेमसंबंधात तुम्ही लाजाळू आहात आणि पुढाकार जोडिदाराने घ्यावा असं वाटतं.

  • नवीन मित्र बनवायला आवडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.