Personality Test : तुमचे मित्र खरे आहेत का? ओळखा या 8 सवयींवरून

मित्र नेहमी विचारपुर्वक करावे, असे म्हणतात. मग त्यांच्यात असे कोणते गुण असावे.
Personality Test
Personality Testesakal
Updated on

How To Select Real And Honest Friends : आपण आपल्या मित्र परिवाराशी भावनिदृष्टीने खूप जोडलेलो असतो. त्याच्यावर फार विश्वास ठेवत असतो. बरेचसे राज त्यांच्याशी शेअर करत असतो. त्यामुळे मित्र फार विचारपूर्वक निवडावे असे म्हटले जाते. आपण मित्रांशी एवढे जोडले जातो की, त्यांचा परिणाम आपल्यावर होऊ लागतो.

आपले कुटुंब आणि नातोवाईक आपल्याला जन्माने मिळतात. पण मित्र परिवार हा आपण निवडलेला असतो. आपल्या अशा अनेक गोष्टी असतात, ज्या आपण आपल्या कुटुंबात बोलू शकत नाही, त्या आपण मित्रांशी खुलेपणाने शेअर करतो. पण अशी मैत्री करताना फार विचारपूर्वक करावी.

Personality Test
Personality Testesakal

शो ऑफ पासून लांब राहतात - खरे मित्र फुशारक्या मारत नाहीत. शो ऑफपासून लांब राहतात. तुम्ही आहात तसे स्वीकारतात. तुमच्यातील कमतरता तुम्हाला सांगून सुधारण्यासाठी मदत करतात.

सुख-दुःखात सोबत करतात - अडचणींमध्येच खऱ्या मित्रांची ओळख होते. प्रामाणिक मित्रच अडचणीच्या वेळी कायम सोबत उभे राहतात. समस्या सोडवण्यात मदत करतात. तर काही मित्र असेही असतील जे तुम्हाला समस्येत बघून तुमच्यापासून दूर पळतील

Personality Test
Personality Test : फक्त नाक बघून तुम्ही सांगू शकाल समोरच्याचा स्वभाव
Personality Test
Personality Testesakal

योग्य सल्ला देतात - प्रामाणिक मित्र कायम तुम्हाला चुकीचे सल्ले आणि चुकीच्या लोकांपासून वाचवतात. ते तुमच्या प्रत्येक गोष्टीला नीट ऐकतात आणि योग्य तोच सल्ला देतात.

इतरांकडे कधी निंदा करत नाही - तुमचे खरे मित्र कधीही तुमच्याविषयी इतरांशी वाईट बोलत नाहीत. जर त्यांना तुमचं काही आवडलं नाही तर ते थेट तुम्हाला सांगतात. आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

एकमेकांविषयी विश्वास - मैत्री विश्वासावर टिकलेली असते. जर तुमचे मित्र खरे असतील तर ते डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतात. आणि तुम्हालाही त्यांच्यावर विश्वास असतो.

Personality Test
Personality Tips : आयुष्य आउट ऑफ कंट्रोल होतंय असं वाटतंय? अजून बिघडण्याआधी या ५ टिप्सने सावरा
Personality Test
Personality Testesakal

तुमचे गुपितं सुरक्षित ठेवतात - तुमचे प्रामाणिक मित्र तुमच्या शेअर केलेल्या खासगी गोष्टी स्वतःपर्यंतच ठेवतात. इतर कोणाला सांगत नाहीत.

तुमच्याशी स्पर्धा करत नाही - जर तुमचे मित्र तुमच्या यशाने खूश होतात, तुमच्यावर जळत नाहीत, तुमच्या विषयी प्रतीस्पर्धकासारखा विचार करत नाहीत तर तुम्ही स्वतःला लकी समजायला हवं.

तुमच्यासाठी कायम वेळ काढतात - मित्र कितीही बिझी का असेना ते त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढतातच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.