How To Boost Self Confidence : तुमचं व्यक्तीमत्व उठावदार होण्यासाठी तुमच्यात आत्मविश्वास भरलेला असणं आवश्यक असतो. विशेषतः करिअर चांगलं घडवण्यासाठी याचं फार महत्व आहे. पण काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असल्याचं जाणवतं. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा काँफीडंस लूज होत आहे तर काही सोप्या टिप्स तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो.
आत्मविश्वास आपल्या व्यक्तीमत्वाला उठाव आणतो. बऱ्याचदा यालाच लोकांचं हॅप्पीनेस सिक्रेट समजलं जातं. तर आत्मविश्वास कमी पडल्याने अनेक गोष्टींचा सामनाही करावा लागतो. त्यामुळेच या टिप्स फार उपयुक्त आहेत.
ड्रेसिंग सेंसवर फोकस करा
तुमची कपड्यांची निवड आणि ते घालण्याची पद्धत तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच फायदेदायक ठरु शकतो. यासाठी चांगला ड्रेस, मॅचिंग फूटवेअर आणि गुड लूक कॅरी करून तुम्ही तुमच्या आतला आत्मविश्वास अनुभवू शकतात.
संवादावर लक्ष द्या
काँफीडंट पर्सनॅलिटी बनवण्यासाठी तुम्हाला संवाद कौशल्यावर पण लक्ष देणं फार आवश्यक असतं. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी बोलताना आपले शब्द, बॉडी लँग्वेज यावर पण फोकस करा. यामुळे तुमच्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये सुधार होईल आणि तुम्ही वेगळाच आत्मविश्वास अनुभवाल.
स्वतःवर विश्वास ठेवा
स्वतःवर विश्वास ठेवताना लोक कायम कंफ्युज्ड आणि डल फील करतात. अशात आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायला हवं. त्यासाठी इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या निर्णयांचा सन्मान करा.
चुकांना घाबरू नका
बरेच लोक चुका होतील या भीतीने कृती करायचेच टाळतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे होणाऱ्या निंदेला कणखरपणे सामोरे जा आणि त्यातून शिका. यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो.
इतरांपेक्षा वेगळे बना
बऱ्याचदा इतरांना कॉपी करण्याच्या नादात लोक स्वतःची युनिक पर्सनॅलिटीशी तडजोड करतात. पण खरंतर तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करून काँफीडेंट फील करू शकतात. त्यामुळे इतरांना कॉपी करण्यापेक्षा स्वतःचे स्कील्स डेव्हलप करण्यावर भर द्या.
भीतीवर मात करा
बऱ्याचदा लोक निंदा किंवा भीतीमुळे लोक आपल्या मनाचं ऐकत नाहीत. त्यामुळे तुम्हा आतल्या आत गुदमरतात. त्यामुळे भीतीने लांब पळण्यापेक्षा त्याचा धीराने सामना करा. आपलं म्हणणं मांडण्यासाठी अजीबात घाबरू नका. यामुळे तुमचा आत्मविश्वास अजून वाढेल.
इतरांच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करा
काही लोक इतरांचं बोलणं फार मनाला लावून घेतात. यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या प्रगतीत अडचण निर्माण करातात. त्यामुळे कोण काय म्हणतं या कडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या चुकांतून स्वतः शिका. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तीमत्व सगळ्यात वृद्धी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.