Melissa McAtee: माझ्या जीवाचे काही बरं वाईट झालं तर ... फायझरच्या व्हिसलब्लोअरने व्हिडिओ शेअर करत केलं धक्कादायक वक्तव्य

Melissa McAtee: फायझरच्या व्हिसलब्लोअर मेलिसा मैकएटी यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
Pfizer whistleblower Melissa mcatee
Pfizer whistleblower Melissa mcatee Sakal
Updated on

Melissa McAtee: बोईंगमधील व्हिसलब्लोअरची माहिती देणाऱ्या दोन कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, आता फायझर व्हिसलब्लोअर मेलिसा मैकएटी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मेलिसा मैकएटीने तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.

फायझरची माजी कर्मचारी मेलिसा मॅकएटी यांनी एक्सवर हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ती 'आत्महत्या करणारी नाही.' या व्हिडिओमध्ये, मेलिसा मैकएटी म्हणाल्या त्याच्या जीवाचे काही बरं वाईट झाले तर त्याला फार्मा कंपन्या आणि सरकार जबाबदार असेल'.

मेलिसा मैकएटी यांनी व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत नाही. तिचे कौटुंबिक जीवन आनंदी आहे. मेलिसा ही व्हिसलब्लोअर आहे, जिने लस उत्पादक कंपनी फायझरच्या लसींमध्ये अनियमितता असल्याचा दावा केला होता आणि त्याचे ईमेल देखील लीक केले होते. मेलिसाने लसीमुळे शरीरावर होणारे परिणाम आणि मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Pfizer whistleblower Melissa mcatee
Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

मेलिसा मैकएटी काय म्हणाल्या?

मेलिसा मैकएटी म्हणाल्या की, ' मी कुटूंबासोबत आनंदी आहे. मी कोणत्याही तणावात किंवा मानसिक आजार नाही. त्यांनी घरात कोणताही बदल केलेला नाही. आज मला काही झाले तर त्याला फार्मा कंपन्या, फार्मास्युटिकल कंपन्या, टेक कंपन्या आणि सरकार जबाबदार असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.