Physical Relation : आजकालच्या धकधकीच्या जीवनात प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिकरित्या फिट राहायचं आहे. यासाठी अनेकजण वर्कआउट करतात. कारण ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. आपण कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत? कोणता वर्कआउट शरीरासाठी योग्यअनेकदा आपण वाचतो. पण ते अमलांत आणतो का?
याचा खरं तर नातेसंबंधांवरही मोठा परिणाम होत असतो. शारीरिक समस्यांमुळे व्यक्ती आपल्या सेक्शुअल लाईफचा आनंद घेऊ शकत नाही. चांगल्या सेक्शुअल लाईफसाठी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या तंदुरुस्त असणं महत्त्वाच आहे. शारीरिक संबंध चांगले राहावेत यासाठी तुमचा स्टॅमिना वाढवला पाहिजे. तो कसा वाढवणार?
तर प्लँक पोज ट्राय करा...
प्लँक पोजला फलकसन योग असेही म्हणतात. प्लँक पोज व्यायामामुळे लैंगिक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. हा व्यायाम प्रकार करताना पोटावर झोपा. त्यानंतर मनगटावर जोर देऊन उठा आणि पायाच्या अंगठ्याच्या साहाय्याने वर या. 1-2 मिनिटे याच स्थितीत रहा. तुम्ही हा वेळ हळूहळू वाढवू शकता.
धनुरासन
शारिरीक संबंध ठेवताना तुम्हाला लगेचच ऑर्गेज्म मिळत असेल तर धनुरासन करा. या आसनाच्या नियमित सरावाने तुमचा स्टॅमिना वाढेल. यासोबतच पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे.
स्क्वॅट्स
स्क्वॅट्सचा व्यायाम केल्याने टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी वाढते. याशिवाय पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो. हा व्यायाम नियमितपणे केल्यास शारीरिक ताकदही वाढते आणि यामुळे तुम्हाला आनंदी ठेवणारे हार्मोन्सही वाढतात. यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहून दोन्ही हात समोरच्या दिशेने उघडा. मग गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारख्या मुद्रेत बसा.
पुशअप
हा व्यायाम केल्याने शरीराचा वरचा भाग मजबूत होतो. यामुळे शरीराचे सर्व स्नायू देखील मजबूत होतात. सतत पुशअप काढल्याने सेक्स करताना थकवा येत नाही. हे करण्यासाठी, आपल्या पोटावर झोपा. नंतर तळहातांच्या मदतीने शरीर वर उचला. नंतर पायाच्या बोटावर उठण्याचा प्रयत्न करा आणि नंतर खाली या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.