पिकासोच्या 'Woman sitting by a window'ला मिळाले 755 कोटी

कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या चित्राच्या लोकप्रियतेवर झालेला नाही
Woman sitting by a window Piccaso painting
Woman sitting by a window Piccaso painting
Updated on

कोरोनासारख्या महामारीमुळे जगातील अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. कित्येक देशांच्या अर्थव्यवस्थेंचा कणा मोडकळीस आला असून अमेरिकेसारख्या देशाच्या अर्थव्यवस्था देखील यात सापडली आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या चित्राच्या लोकप्रियतेवर झालेला नाही असे स्पष्ट दिसतेय. पाब्लो पिकासो .यांचे ''वूमन सिटींग बाय अ विंडो(Marie-Therese) हे चित्र तब्बल 103.4 दशलक्ष अमेरिकी डॉलर अर्थात भारतीय चलनात जवळपास ७५५ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. न्यूयॉर्कमधील क्रिस्टी येथे या गुरूवारी चित्राचा लिलाव झाला.

Woman sitting by a window Piccaso painting
Bedroom Essentials: या 5 खास गोष्टी प्रत्येक बेडरूममध्ये असाव्यात

1932 साली हे चित्र पुर्ण झाले असून आज या चित्राला 89 वर्ष पूर्ण झाले आहे. हे चित्र $ 90 दशलक्ष डॉलर्सला विकले गेले असून यामध्ये फि आणि कमिशन अॅड केल्यानंतर यांची किंमत 103.4 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली.

गुरुवारी झालेल्या विक्रीमध्ये लंडनमध्ये आठ वर्षांपुर्वी झालेल्या लिलावाच्या दुप्पट किमंत मिळाली आहे. तेव्हा 45 दशलक्ष डॉलरला लिलाव झाला होता. कोरोनासारख्या महामारीच्या काळा नुकत्याच झालेल्या विक्रीमुळे जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या पेंटिंगच्या लोकप्रियतेवर झालेला नाही असे स्पष्ट दिसतेय.

स्पनिश पेंटर असलेल्या पिकासो यांच्या ५ पेंटिंग्जला 100 दशलक्ष डॉलर्सहून जास्त किंमत मिळाली आहे. जगभरात होणाऱ्या लिलावांमध्ये पिकासो यांच्या पेंटिंग्जची कोट्यवधींना विक्री होते

Woman sitting by a window Piccaso painting
धुम्रपानानंतर सॅनिटायझर वापरणं पडलं महागात

पाब्लो पिकासो यांचा जन्म २५ ऑक्टोबर १८८१ रोजी स्पेनमध्ये झाला होता. फ्रान्समध्ये त्यांनी बराच वेळ वास्तव्यास होते. पिकासो यांनी स्पेनमध्ये नागरी युद्धाकाळात झालेल्या प्रचंड संहाराची चित्रे आजही जगभरात नावाजली जातात. फ्रान्समध्ये ८ एप्रिल १९७३ रोजी पिकासो यांचा हॉर्ट अॅटकने राहत्या घरीची त्यांचा मृत्यू झाला.

Woman sitting by a window Piccaso painting
चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी वापरा टोमॅटो जेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.