Pigmentation Home Remedies : पिगमेंटेशनमुळे चेहरा खूपच विचित्र दिसतोय? हरवलेलं तेज पून्हा मिळवा, हे उपाय करा

तुळशीच्या पानांनी डाग कसे कमी करायचे?
Pigmentation Home Remedies
Pigmentation Home Remediesesakal
Updated on

Pigmentation Home Remedies : जोवर आपल्या घराच्या दारात कोणी कचरा आणून टाकत नाही, तोवर आपल्याला या पृथ्वीवर पसरण्याची कचऱ्याची आठवण होत नाही. केवळ कचरा नाहीतर धुळीमुळे पसरणारे प्रदुषणही जोवर आपल्या चेहऱ्यावर येऊन काळे डाग पसरवत नाही, तोवर आपल्याला त्याबद्दल काळजी वाटत नाही.

आजच्या धावपळीच्या जीवनात माणसाला स्वत:ची काळजी घ्यायलाही वेळ मिळत नाही. तणाव आणि प्रदूषणामुळे अनेक आजार आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्वचेतील मेलेनिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पिगमेंटेशन होतात.

जरी वयानुसार पिगमेंटेशन येत असले. तरी, आजच्या काळात, जीवनशैलीमुळे, लहान वयातच महिला आणि मुलींच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशनचे डाग दिसतात. चला जाणून घेऊया पिगमेंटेशनसाठी कोणते घरगुती उपाय आहेत. (Pigmentation Home Remedies : Follow these home remedies to remove pigmentation from the face, spots will be removed)

Pigmentation Home Remedies
Sleep With Feet Facing South : दक्षिणेकडे पाय करून का झोपायचं नसतं? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं?

पिगमेंटेशनसाठी या सवयी लावून घ्या

शरीरात पाण्याची कमतरता

पावसाळ्यात शरीर जास्त प्रमाणात डिहायड्रेट होते. अशा परिस्थितीत शरीराला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. डिहायड्रेशनमुळे पिगमेंटेशनची समस्या वाढू शकते.

हार्मोन्सचे असंतुलन

महिलांच्या शरीरात हार्मोन्स नेहमीच असंतुलीत असतात. बर्‍याच महिलांमध्ये पीसीओडी आणि पीसीओएसची समस्या असते. या व्यतिरिक्त, कमी आहार आणि सन लाईटमुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. यामुळे, शरीरात मेलेनिनचे प्रमाण वाढते. पिगमेंटेशनची समस्या वाढण्याचे कारण हेच आहे. (Lifestyle)

अपुरी झोप

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे त्वचा निस्तेज व निर्जीव होते. आपल्याला पुरेशी झोप लागल्यास त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात. जर आपल्याला 7 ते 8 तासांची झोप येत नसेल तर त्वचा दुरुस्त होणार नाही आणि पिगमेंटेशनची समस्या वाढू शकते.(Beauty tips in marathi)

Pigmentation Home Remedies
Pudina For Face: तुमच्या त्वचेसाठी पुदिन्याचा असा होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या

शरीरात प्रथिन्यांची कमतरता

शरीरात प्रथिने नसल्याने केवळ आरोग्याचेच नव्हे तर त्वचेचेही नुकसान होते. त्याच्या कमतरतेमुळे, शरीराच्या पेशी व्यवस्थित काम करत नाहीत आणि वृद्धत्वाची समस्या दिसू लागते. प्रथिनेअभावी मृतपेशी काढून शरीर नवीन पेशी बनवत नाही. ज्यामुळे मेलेनिनचे प्रमाण अधिक वाढते.

पिगमेंटेशनवरचे उपाय कोणते?

बटाटा कसा वापरायचा?

पिगमेंटेशनचे डाग कमी करण्यासाठी, तुम्ही बटाटा किसून घ्या आणि नंतर मलमलच्या कपड्यात ठेवून रस काढा. हा रस फ्रिकल्सवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. बटाट्याचा रस तुमची फुगवटा कमी करू शकतो. बटाट्याचा रस चेहऱ्यावरील डाग दूर करतो आणि त्वचा उजळ करतो. आठवड्यातून किमान 3 वेळा याचा वापर करा.

Pigmentation Home Remedies
Masoor Dal Face Pack: मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…

तुळशीच्या पानांनी डाग कसे कमी करायचे?

पिगमेंटेशनच्या समस्येमध्ये 7 ते 8 तुळशीची पाने बारीक करून त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता ही पेस्ट फ्रिकल्सवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. हायपर पिग्मेंटेशनमध्ये तुळशीची पाने फायदेशीर आहेत.

पिगमेंटेशनसाठी लिंबूचा वापर

पिगमेंटेशनसाठी लिंबाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि बदाम तेल घाला. आता याने तुमच्या चेहऱ्याला १० ते १२ मिनिटे मसाज करा आणि भरण स्वच्छ पाण्याने धुवा. याशिवाय एक चमचा लिंबाच्या रसामध्ये मध मिसळून त्वचेवर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.