Pineapple Peel Reuse : वजन, पचनक्रीया आणि बरंच काही, अननसाच्या सालीचे अनेक फायदे, असा करा आहारात समावेश

अननसाचे पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
Pineapple Peel Reuse
Pineapple Peel Reuseesakal
Updated on

Pineapple Peel Reuse :

हिवाळ्यात अनेक सिझनेबल फळांची रेलचेल असते. डाळींब, सफरचंद, अननस अशा पोषक तत्व असलेल्या फळांमुळे आरोग्य सुधारण्यात मदत होते.अशातही अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. अननस खाल्ल्याने शरीराला व्हिटामिन सी पुरेपूर प्रमाणात मिळते.  

लोकांना या गोड आणि आंबट फळाची चव खूप आवडते. हे फळ खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पण आपल्यापैकी बहुतेकजण हे फळ खातात पण त्याची साले फेकून देतात.

अननस फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकीच त्याची साले देखील आहेत. अननसाची साले पाण्यात उकळून ते गाळून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.

Pineapple Peel Reuse
Mango Peel Benefits : आंब्याची साल फेकू नका, आरोग्यासाठी अन् सौंदर्य वाढवण्यासाठी फायद्याची

कारण अननसाची साले हे पौष्टिकतेचे भांडार आहे. व्हिटॅमिन ए, बी सी, पोटॅशियम आणि मॅंगनीज यांसारखे आवश्यक पोषक घटक त्यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात.

याशिवाय त्यात अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड्स सारखी संयुगेही असतात. अननसाच्या सालीचे पाणी प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. या लेखात आम्ही तुम्हाला अननसाची साल उकळवून त्याचे पाणी पिण्याचे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत सांगत आहोत.

Pineapple Peel Reuse
Benefits Lemon Peel: फक्त लिंबूच नव्हे तर लिंबाचे सालही खूप फायदेशीर; असा करा वापर

उकडलेल्या अननसाच्या सालीचे पाणी

  • अननसाचे पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि तुम्ही निरोगी राहता.

  •  त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

  • वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

  • रक्तदाब नियंत्रणात राहतो.

  • शरीरातील सूज काढून टाकण्यास मदत होते. 

  • हृदय निरोगी ठेवते.

  • सांधे आणि स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो.

  • जखमा लवकर भरून येण्यास मदत होते.

  • ते साचलेली घाण काढून शरीराला डिटॉक्स करते.

Pineapple Peel Reuse
Almond Peel : हे फायदे वाचाल तर तुम्ही बदामाची साल कधीच फेकणार नाही

 अननसाच्या सालीचे उकडलेले पाणी कसे बनवावे

सर्व प्रथम तुम्ही गॅसवर भांड ठेवा. २ ग्लास पाणी आणि एक कप अननसाची साले घालून उकळा. पाणी निम्मे झाले की ते गाळून कपमध्ये काढा. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि गूळ घालू शकता.

जर तुम्हाला अननसाच्या पाण्याचे फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे. आपण अननसाच्या सालीचे पाणी दिवसातून 2-3 वेळा पिऊ शकता. कोमट पाणी प्या. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.