Pink lips : ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी

Lipcare tips : ओठ हा आपल्या चेहऱ्याचा फार महत्वाचा भाग आहे. सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात.
Pink lips
Pink lips sakal
Updated on

ओठ हा आपल्या चेहऱ्याचा फार महत्वाचा भाग आहे. सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात. पण काही कारणांमुळे ते काळे पडतात. अनेकवेळा आपल्याला आपल्या ओठांची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. तुम्हाला माहित आहे का? मोठमोठे सेलिब्रिटी लिप्स सर्जरी करून घेतात.

आजकाल सर्वसामान्य लोकही ते करायला लागले आहेत. त्याने तुमचे ओठ नेहमी गुलाबी दिसतात. परंतु आपण ते नैसर्गिकरित्या गुलाबी देखील करू शकता. डॉक्टर रश्मी शर्मा, जे एक प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ आहेत, त्यांनी हा उपाय त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. याच्या मदतीने तुम्ही घरगुती उपायांनीही तुमचे ओठ गुलाबी करू शकता.

लिप स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • साखर - 2 चमचे

  • मध - 1 टीस्पून

लिप स्क्रब कसा बनवायचा

लिप्स स्क्रब बनवण्यासाठी एका वाटीत साखर घ्यावी लागेल.

नंतर त्यात मध मिसळावे लागते.

या दोन्ही गोष्टींचे मिश्रण तयार करावे लागेल.

यानंतर ते ओठांवर लावा आणि हलक्या हातांनी चोळा.

हे 10 ते 15 मिनिटे ओठांवर तसेच ठेवा.

नंतर पाण्याने स्वच्छ करा.

तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा याचा वापर केल्यास तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होतील.

Pink lips
Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? मग या टिप्स नक्की फॉलो करा...

एलोवेरा जेल

तसेच, एलोवेरा जेलने देखील ओठांचा काळेपणा दूर होतो. जर तुम्हाला ओठांचा काळेपणा लवकर दूर करायचा असेल तर यासाठी तुम्ही दररोज एलोवेरा जेलचा वापर करा. यासाठी प्रथम एका वाटीत कोरफडीचा गर घ्या. तो ओठांवर लावून चांगला मसाज करा, सुमारे 10 ते 15 मिनिटं जेल ओठांवर राहू द्या. नंतर कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा पूर्णपणे कमी होईल.

स्क्रबचे फायदे..

स्क्रब ओठांची त्वचा एक्सफोलिएट करते, त्यांना मऊ आणि मुलायम बनवते. त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता.

तुम्ही तुमच्या ओठांना हायड्रेट ठेवण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. यामुळे डेड स्किन निघून जाते.

Related Stories

No stories found.