Pink Vs. Blue : मुलींचा गुलाबी अन् मुलांचा निळा रंग, कोणी ठरवलं? जाणून घ्या इतिहास

रंग आपल्या आयुष्यात नवचैतन्य भरत असतात.
Pink Vs. Blue
Pink Vs. Blueesakal
Updated on

History Of Why Pink For Girls And Blue For Boys :

विचार करा जर सगळं जग जर एकाच रंगाचं किंवा फक्त ब्लॅक अँड व्हाइट कलरमध्ये असते तर? सगळंच निरस, सपक झालं असतं. रंग आपल्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येतात. निसर्गात वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरलेले असतात. प्रत्येक रंग आपल्या मनात वेगवेगळे भाव निर्माण करतात. त्यामुळे त्या त्या रंगाला आपण त्या अमुक एका भावासाठी सांकेतिक रंग नेमले गेले.

त्यातच मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा असे रंग समजण्यात येते. प्रत्यक्ष आयुष्यात यात काहीवेळा विसंगतीही आढळते. मग मुलींना गुलाबी आणि मुलांना निळा रंग हे ठरवलं कोणी? असा प्रश्न पडतो. यामागचा इतिहास जाणून घेऊया.

Pink Vs. Blue
Pink Vs. Blueesakal

यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का?

रंग आणि स्त्री-पुरुष असणे याचा वैज्ञानिकदृष्ट्या कोणताही संबंध नाही. लहान मुलगा निळ्या वस्तू, खेळणी, कपडे लवकर उचलतात तर मुली गुलाबी रंगाच्या हे सहज घडत असलं तरी यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलंले नाही.

पण निळा रंग पुरुषांसाठी आणि गुलाबी महिलांसाठी हा भेद त्यांच्या कपड्यांत फरक करता यावा यासाठी देण्यात आला आहे, हे कळल्यावर काहींना आश्चर्य वाटेल. पण ही पद्धत कधीपासून आणि कुठून सुरू झाली, जाणून घेऊया.

Pink Vs. Blue
Bridal Fashion: ब्राइडल आउटफिट खरेदीवेळी या महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
Pink Vs. Blue
Pink Vs. Blueesakal

काय आहे इतिहास?

फ्रांसची राजधानी पॅरीस इथे १९४० च्या दशकात फॅशन इंडस्ट्री सुरू झाली. पॅरीस शहराला कित्येक वर्ष फॅशनची राजधानी म्हणून ओळखलं जायचं. जगभरातले पर्यटक इथे आल्यावर आयफेल टॉवरला भेट देण्यासाठी आणि फॅशनेबल कपडे खरेदीसाठी येत.

इथे विक्री होणाऱ्या कपड्यांमध्ये बहुतांश महिला गुलाबी रंगाचे कपडे विकत घ्यायचे आणि पुरुष निळ्या रंगाचे कपडे विकत घ्यायचे अशी आकडेवारी पॅरीस शहराने प्रकाशीत केली होती. ही आकडेवारी अन् मानसिकता प्रथन तेथील नजीकच्या देशांमध्ये प्रचलीत झाली आणि नंतर थोड्याच काळात याचे लोण जगभरात पसरलं, असं सांगितलं जातं.

Pink Vs. Blue
Women Fashion Tips: इअरिंग्सचा असाही करता येतो वापर! हे हॅक नक्की ट्राय करून बघा
Pink Vs. Blue
Pink Vs. Blueesakal

महिला, मुलींमध्ये इतर कोणत्याही रंगांच्या कपड्यांपेक्षा गुलाबी रंगाचे आकर्षण अधिक असल्याच्या फ्रांसच्या निरीक्षणाला नंतर अमेरिका, इंग्लंड या देशांनीही दुजोरी दिला. भारतातही हा ट्रेंड दिसून आला. एका पिढीने हा ट्रेंड स्वीकारला आणि पुढच्या पिढ्यांकडे पसरवला.

अमेरिकेच्या विस्कोसिन स्टिव्हस् पॉईंट या विद्यापीठाने २००७ मध्ये मुलींना आवडणाऱ्या गुलाबी रंगाचे कारण शारीरिक आहे की, अजून काही यासाठी एक सर्वेक्षण केले. त्यात २०० मुलींना त्यांना गुलाबी रंग का आवडतो हे विचारलं होतं. त्यापैकी १५ टक्के मुलींचं म्हणणं होते की यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असू शकेल.

५५ टक्के मुलींनी इतरांच्या अंगावर हा रंग बघून स्वतः घालण्यास सुरुवात केली. तर इतर ४० टक्के मुलींना त्यांच्या गुलाबी रंग आवडण्याविषयी काहीही कारण देता आलेले नाही.

Pink Vs. Blue
Women Fashion: सेम प्रकारच्या जीन्स घालून कंटाळलात? मग या स्टाइलिश जीन्स ट्राय करून बघा
Pink Vs. Blue
Pink Vs. Blueesakal

अमेरिकेत असा प्रचलित झाला गुलाबी रंग

अमेरिकेत १९५३ मध्ये घडलेली एक घटना महिलांमध्ये गुलाबी रंगाची आवड वाढण्यास कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं. त्या वर्षी अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवला होता. डिव्हाईट इन्स्होवर या व्यक्तीची अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. यावेळी त्यांच्या पत्नी मॅमी इन्सोव्हर या गुलाबी रंगांच्या गाऊनमध्ये लोकांना दिसल्या. त्यावेळच्या वृत्तपत्रांनी व्हाईट हाऊसचा उल्लेख पिंक हाऊस म्हणून केला हाता. मॅमी यांचे गुलाबी रंगाचे प्रेम लोकांना आवडले आणि हा रंग अधिकाधिक लोक परिधान करू लागल्या.

रंगांचे सांकेतिक भाव

निळा रंग हा प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचं प्रतिक मानलं जातं. हेच कारण आहे की, कित्येक बँकांच्या नावात निळ्या रंगाची अक्षरं किंवा निळ्या रंगाचा वापर अधिक केलेला दिसतो. पुरुषांच्या सुटस् च्या रंगात निळा रंगाचं प्रमाण हे त्यामुळेच अधिक बघायला मिळतं. त्याचप्रमाणे, गुलाबी रंग हा मृदूता दर्शवतो, म्हणून तो रंग महिला अधिक प्रमाणात वापरतात.

मार्केटिंगच्या मदतीने फॅशन इंडस्ट्रीने गुलाबी रंग हा केवळ युरोपियन देशांसाठी मर्यादित न ठेवता आशिया खंडात गुलाबी रंग मुलींचा आवडता' या आशयाच्या जाहिराती केल्या आणि एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तब झालं. हेच निळ्या रंगासोबत झालं आणि आज जगभरात 'निळा रंग म्हणजे मुलांचा' हे प्रसिद्ध झालं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.