Death Facts In Marathi: मृत्यूनंतर आपला हा अवयव असतो कार्यरत, मृत्यूबद्दलच्या या गोष्टी तुम्हालाही आश्चर्यचकीत करतील!

Interesting Death Fact : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किती दिवसांआधी झालाय हे कसं कळतं?
Death Facts In Marathi
Death Facts In Marathi esakal
Updated on

Rarely known 10 disturbing death facts:


जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे. जो जीव जन्माला आला आहे त्याचा मृत्यू होणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. ते कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे मृत्यूला लोक घाबरतात.  कोणाचा अपघाती, तर कोणाचा आजाराने मृत्यू होतो.  मृत्यू होण्याची कारणं अनेक असतात. पण तो कुणालाही चुकलेला नाही.

सध्या पितृ पक्ष सुरू आहे. या काळात मृत झालेल्या पूर्वजांच्या शांतीसाठी अनेक विधी केले जातात. हे विधी मृत्यूपश्चात केले जातात. पण, खरंच जेव्हा एखाद्याचा मृत्यू होत असतो तेव्हा त्याला कसं वाटतं असतं. (Death)

Death Facts In Marathi
Solitary Deaths : सहा महिन्यांत एकटे राहणाऱ्या ४० हजार लोकांचा मृत्यू, १३० मृतदेह तर वर्षभर सडले; जपानमध्ये सरकारसमोर नवे संकट

मृत्यू हा शब्द जितका भयावह वाटतो तितकाच त्याच्याशी निगडित सत्य त्याहून भयानक आहे. जन्म जितका गुंतागुंतीचा आहे तितकाच मृत्यूही कठीण आहे. या काळात तुमच्या शरीराला आणि मेंदूला जे वाटते ते भयानक आहे. चला तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगतो, ज्याचा संबंध मृत्यूशी आहे.

आपण जिवंत असताना जे काही खातो ते पोटात असलेल्या एन्झाइम्सद्वारे पचले जाते. माणसाच्या मृत्यूनंतरही ते आपल्या शरीरात जिवंत राहतात. मृत्यूनंतर तीन दिवस ते आपल्या शरीरात असलेले अन्न कण खातात आणि अन्न संपताच ते आपले शरीर स्वतःच खाण्यास सुरुवात करतात.

Death Facts In Marathi
Farmer's Death Fund: जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी मिळणारच! सरकारनं बदलला जीआर

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर २० सेकंद इतकाच वेळ आपल्या मेंदू कार्यरत असतो. त्यानंतर तो ही कार्य थांबवून थंड पडतो.  

मानवी शरीराचे विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी मृतदेह जाळले जातात आणि इतर ठिकाणी ते दफन केले जातात, परंतु मानवी शरीर जमिनीपेक्षा पाण्यात जास्त वेगाने विघटित होते. हा वेग पाण्यामध्ये 4 पटीने वाढतो.

तुम्हाला तुमच्या जवळील एखाद्या व्यकीचा मृत्यू झालाय हे ऐकणे कठिण वाटत असेल. मात्र,  जगभरात दररोज 1 लाख 53 हजार लोकांचा मृत्यू होतो, हे सत्य आहे.

Death Facts In Marathi
Solitary Deaths : सहा महिन्यांत एकटे राहणाऱ्या ४० हजार लोकांचा मृत्यू, १३० मृतदेह तर वर्षभर सडले; जपानमध्ये सरकारसमोर नवे संकट

जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा तिचे प्राण देखील निघून जाते. सर्व अवयव शांत होतात. पण, जास्त काळ काम करणारा अवयव मानवी कान आहे. म्हणजेच मानवाच्या मृत्यूनंतर सर्वात शेवटी कार्य थांबवतो तो कान आहे.   

मृत्यूशी संबंधित वस्तुस्थिती अशी आहे की म्हातारपण किंवा वय वाढलं आहे म्हणून माणूस मरत नाही, तर त्यासोबत येणारे आजाराने मृत्यू होऊ शकतो.

सर्व लोकांच्या शरीरावर कीटक वाढतात असे नाही. काही लोकांच्या मृत्यूचे कारण असे शकते ज्यात त्यांच्या शरीरावर किडे पडू शकतात. या  कीटकांच्या प्रजातींवरून मृत्यू केव्हा झाला, याचा ते अचूक अंदाज लावू शकतात.

शरीरावर आढळणाऱ्या कीटक आणि जीवाणूंवरून मृत्यू किती काळ झाला असावा हे फॉरेन्सिक शास्त्रज्ञ सांगू शकतात. कीटकांच्या प्रजातींवरून मृत्यू केव्हा झाला, याचा ते अचूक अंदाज लावू शकतात.

Death Facts In Marathi
Suhasini Deshpande Death: मराठी सिनेसृष्टीची लाडकी खलनायिका हरपली; अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन

मृत व्यक्तींच्या मृतदेहावर सूज येऊ लागल्याने त्यांच्यावर वेळेवर अंत्यसंस्कार केले जातात. वास्तविक, शरीराच्या आतून वायू आणि द्रव बाहेर पडतात, ज्यामुळे शरीर हवा भरल्यासारखे फुगते.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची हाता पायाची बोटे सुकतात. त्यामुळे, ते त्यांच्या अधिक लांब दिसू लागतात. त्यामुळे लोकांना असे वाटते की, मृत्यूनंतर व्यक्तीच्या हातांची लांबी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.