Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितरांसाठीची भोजन वेळ मानला जातो, पितृदोष घालवण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घ्या
Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024esakal
Updated on

How to check Pitru Dosha in kundali :

भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. त्याला बोली भाषेत अनेक नाव आहेत.  या पितृपक्षाची एक अनामिक भीती सगळ्यांच्याच मनामध्ये असते. वास्तविक एक वर्ष म्हणजे पितरांचा एक दिवस समजला तर हा भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितरांसाठीची भोजन वेळ मानला जातो. त्यामुळे आपल्या दिवंगत पूर्वजांच्या  स्मृतीसाठी त्यांना अन्न देण्याचा काळ म्हणून या पितृपक्षाला ओळखले गेले आहे. 

पितृपक्षाच्या काळात पितरांना शांत करण्यासाठी तर्पण करावे लागते. देवाच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात प्रगती करू शकत नाही, अशी पौराणिक समजूत आहे. त्याचप्रमाणे जर तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर तुमच्या कामात नेहमीच काही ना काही अडथळे येतात. (Pitru Paksha 2024)

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024: पितृ पक्षात 'या' तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते

याशिवाय तुम्ही तुमच्या पूर्वजांची वारंवार अवहेलना केल्यास तुमच्यावर पितृदोषाचा शापही लागू शकतो. पितृदोषाची लक्षणे आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊया.

पितृदोष कशामुळे लागतो? (Signs to identify Pitra Dosha )

पितृदोष लागण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे, तुमच्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अचानक झाला असेल आणि त्या व्यक्तीचे मृत्यू संस्कार व्यवस्थित केले गेले नसतील तर त्याचा दोष तुम्हाला लागू शकतो.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार, श्राद्ध विधी संस्कृतीनुसार करावे लागतात. जर तसे न झाल्यास त्या व्यक्तीचा दोष आपल्याला लागू शकतो. त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि आपल्या मागे अनेक दुःख संकटे उभे करत राहतो असे मानतात.

Pitru Paksha 2024
Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

कुंडलीतील पितृदोष कसा ओळखतात?

मृत व्यक्तीचा आत्म भटकत असेल त्याला मोक्ष मिळाला नसेल तर तो घरातील कर्त्या पुरुषासाठी घातक ठरू शकतो. घरातील सर्वच पिढ्यांमध्ये दोष वाढत जातो. पितृदोष लागण्याचे दुसरे कारण म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये दुसऱ्या, आठव्या आणि दहाव्या स्थानी सूर्यासोबत जर केतू ग्रह आला असेल तर कुंडलीमध्ये पितृदोष बनतो. जर याकडे दुर्लक्ष करून पितृदोष घालवण्यासाठी काही उपाय केले नाहीत तर पिढ्या बदलतात तसे हा दोष वाढत जातो.  

पितृदोष आपल्याला आहे की नाही हे ओळखण्याची काही लक्षणे (What are the signs of Pitra Dosha?)

जेवणात पडते घाण

घरात बनवले जाणारे सात्विक जेवण गृहिणी लक्ष देऊन करत असते. ती कितीही स्वच्छता घेत असेल. पण तरीही जेवायला बसताना किंवा जेवताना त्याच्यामध्ये विचित्र घडतं. जेवणात एखादा केस, खडे मुंग्या पडणे पितृदोषाचे मुख्य लक्षण आहे. ज्याचा विचारही करू शकत नाही,अशी गोष्ट त्यामध्ये सापडणे हे पितृदोषाचे लक्षण आहे. 

Pitru Paksha 2024
Paush Amavasya 2022: वर्षाची शेवटची अमावस्या महत्वाची; जाणून घ्या महत्व विधी अन् मुहू्र्त

घरात सतत आजारपण असणे

घरात सर्व काही ठीक असेल पण एखाद्या व्यक्तीची तब्येत सतत बिघडत असेल तर हा पितृदोष असू शकतो. एखादी व्यक्ती तब्येत सतत बिघडत असेल तर त्याला आपण डॉक्टरकडे नेतो. पण जेव्हा या आजारपणाला बरे होण्यासाठी अनेक वर्षे लागू लागतात तर हा मोठा पितृदोष मानला जातो.

Pitru Paksha 2024
Pitra Dosh: पितृदोष म्हणजे काय? का लागतो पितृदोष जाणून घ्या कारणे आणि उपाय

संततीसुख लाभत नाही

आजकाल उशिरा लग्न किंवा आरोग्याच्या तक्रारी यामुळे जोडप्यांना संतती प्राप्तीसाठी पासून वंचित राहावे लागते. अनेक जोडप्यांना चाळीशी ओलांडली तरी मुलं होत नाहीत. हा पितृदोषाचा एक प्रकार आहे. जर तुमच्या कुंडलित पितृदोष असेल तर तुम्हाला संतती प्राप्त होत नाही. ज्योतिष शास्त्रात सांगितलेले आहे.

आरोग्य चांगले असेल तरीही एखादे बालक जन्माला येऊन लगेच मृत्यू पावते किंवा जन्माला येऊन मृत्यू पावत असेल तर तो पितृदोष असू शकतो.

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

 पितृदोष घालवण्यासाठीचे काही सोपे उपाय

  • पितृदोष असो किंवा नसो तुम्ही तुमच्या पितरांचे स्मरण करून त्यांना एखादा आवडता पदार्थ किंवा नैवेद्य दाखवला तर काहीही बिघडत नाही. त्यामुळे या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान करावे.

  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला काळे तीळ घातलेले दूध वहावे. तसेच अक्षता आणि फुलं वाहून इतरांना शांत राहण्याचे प्रार्थना करावी.

  • पितृपक्षात दररोज सायंकाळी घरातील दक्षिण दिशेला एक दिवा ठेवावा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात पसरलेला अंधारही नाहीसा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.