Pitru Paksha 2024 : पितृदोषाचे घराण्यातील किती पिढ्यांवर असते सावट? गरूड पुराणात दडलीयेत अनेक प्रश्नांची उत्तर

Pitru Dosh Upay : काही सोप्या उपयांनी पितृदोषापासून मुक्ती कशी मिळवावी? जाणून घ्या
Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024esakal
Updated on

Pitru Paksha 2024 :

पितृपक्ष पंधरवडा हा कालावधी पितृदोष असे संबंधित आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या काही इच्छा पूर्ण असतील तर संपूर्ण कुटुंबाला पितृदोष लागतो. पितृदोष कुंडलीत असेल तर कुठलंही शुभकाम घडत नाही. तसेच प्रगती मध्येही अडथळे येतात. त्यामुळे पितृदूषणाचे निवारण लवकरात लवकर केले जाते.

पितृपक्षात मित्रांचे श्राद्ध आणि दर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते. तसेच हे श्राद्ध जे व्यक्ती करत असेल त्यालाही त्याचा फायदा होतो. गरुड पुराण हे एक पौराणिक ग्रंथ आहे. त्यामध्ये सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनाशी संबंधित आहेत.

Pitru Paksha 2024
Mangal Dosh Upay: कुंडलीत आलेला मंगळ राशीला त्रासदायक ठरतो; अशी मिळवा मंगळ दोषापासून सुटका

पितृदोषाबद्दल गरुड पुराणात काही गोष्टींचे स्पष्ट उल्लेख केले आहेत. त्यातूनही आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. ते प्रश्न कोणते आणि त्याचे उत्तर काय आहेत हे जाणून घेऊयात.

पितृदोषाचा कालावधी काय असू शकतो ? (Pitru Dosh )

गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे पितृदोष एखाद्या व्यक्तीला असेल तर तो त्रास फक्त त्या व्यक्तीला देत नाही. तर त्या व्यक्तीशी संबंधित सर्व कुटुंबाला हा त्रास भोगाव लागतो. कुटुंबप्रमुखाला पितृदूषणाचा त्रास असेल तर घरातील सर्वच लोकांना याचा त्रास होऊ शकतो. पितृदोषाचे निवारण केले गेले नाही तर हा त्रास सात पिढ्यांमध्ये असू शकतो.

जशी पिढी बदलेल तसा हा त्रास सुरूच राहतो. पितृदोषामुळे तुमच्या वंश वाढीला ही आळा बसतो. तसेच पितृदोष असेल तर घरात सतत मुलांचे किंवा नव्याने जन्माला येणाऱ्या अर्भकांचा मृत्यू होऊ शकतो.

Pitru Paksha 2024
Vastu Dosh Upay : घरातल्या अडचणींचा फेरा काही सुटेना? हे घ्या वास्तू दोष दूर करणारे काही खास उपाय

पितृदोष का लागतो? (Pitru Dosh)

कधीकधी कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो. जी व्यक्ती घरात नकोशी असेल त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार श्राद्ध तर पण हे नीट केले जात नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो. हा दुखी आत्मा कुटुंबातील सदस्यांना वारंवार आठवण अस्तित्वाचे जाणीव करून देत असतो. अंतिम संस्कार नीट पार न पडल्याने ते व्यक्ती नाराज असते. त्यामुळे ती कुटुंबाला त्रास देते.

जन्म कुंडलीनुसार पितृदोष आहे हे कसे ओळखले जातात (Pitru Dosh)

घरात सुरू असलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे पितृदोष आहे याचा अंदाज बांधला येऊ शकतो. पण त्याला ठोस कारण मिळतं हे जन्मकुंडलीतून. घरातील कर्त्या पुरुषाची जन्म कुंडली जळ तपासली आणि त्यात जर दुसऱ्या आठव्या आणि दहाव्या स्थानी सूर्यासोबत केतू ग्रहाला असेल तर पितृदोष आहे हे ओळखलं जातं.

तसेच गरुड पुराणात घरातील कर्त्या पुरुषांनी एखाद्या जीवजंतू साप किंवा निराधार व्यक्तीची हत्या केली असेल किंवा त्याच्यावर अत्याचार केला असेल तरीही पितृदोष लागू शकतो.

Pitru Paksha 2024
Astrology Horoscope : पाळीव प्राण्यांचा कुंडलीतील ग्रहांवर होतो मोठा परिणाम; हा प्राणी विशेष महत्वाचा

घरातील कर्त्या पुरुषावर पितृदोष असल्याने काय होतं (Pitru Dosh)

एखाद्या टेबल किंवा खुर्चीचा पाय मोडला असेल तर ती खुर्ची कोलमडून जाते. तिला उभारायचे ताकद नसते. तसं घरातील कर्त्या पुरुषावर लागलेला पितृदोष संपूर्ण घराला कोलमडून टाकतो. म्हणजेच, घरातील उर्वरित सदस्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो.

त्याच बरोबर स्त्रिया देखील नेहमी दुःखी राहतात. पितृदोषाचा परिणाम घरातील प्रमुखाच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही होतो. यामुळे घराचा प्रमुख अनेकदा असे निर्णय घेतो ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील सुख, समृद्धी आणि शांती बाधित होते.

Pitru Paksha 2024
Kaal Sarp Dosh : जन्म पत्रिकेत कालसर्प दोष आहे? यामंदिरात दर्शन घेतल्याने होतो फायदा

पितृदोषापासून मुक्ती कशी मिळवावी? (Pitru Dosh)

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करणे हा उत्तम मार्ग आहे, असे गरुड पुराणात सांगितले आहे. त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला गरीब, ब्राह्मण आणि गरजूंना अन्नदान करणे आणि अन्नदान करणे हा देखील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग आहे.

पितृपक्षाच्या काळात पितरांचे आवाहन करून गाय, कुत्रा, कावळा इत्यादी प्राण्यांना भाकरी खाल्ल्याने पितृदोषही दूर होतो. याशिवाय पितृ पक्षात सकाळी दक्षिण दिशेला जल अर्पण केल्याने आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पितृदोषापासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.