Pitru Paksha 2024 : पूर्वजांचे फोटो देवघरात लावावे की नाही ? शास्त्रात सांगितलंय..

पितरांचे फोटो मंदिरात ठेवल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते,
Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024esakal
Updated on

Pitru Paksha 2024 : 

एखादी व्यक्ती मृत पावली असेल तर तिचा फोटो घरात लावला जातो. जेव्हा एखादा नवा व्यक्ती आपल्या घरी येतो. तेव्हा मृत व्यक्तीचे फोटो पाहून प्रश्न उपस्थित करतो,की असे फोटो घरात लावायचे नसते, हे शुभ नसते. तर काही लोक देवघरात मृत व्यक्तीचा फोटोची पूजा करतात, असा प्रसंग प्रत्येकाने अनुभवला असेल. 

देवाचे फोटो किंवा मूर्ती याशिवाय आपण आपल्या घरातील मंदिरात पूजेचे साहित्य वगैरे ठेवतो. परंतु बरेच लोक आपल्या पूर्वजांचे फोटोही मंदिरातच ठेवतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा मनात प्रश्न पडतो की असे करणे योग्य आहे का? की आपण मोठी चूक करत आहोत? (Pitru Paksha)

Pitru Paksha 2024
Pitru Paksha : पितृपक्ष पंधरवड्यामध्ये भाज्यांची वाढली मागणी; भाजीपाल्यासह फळांच्याही किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ

अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला वास्तुशास्त्रात मिळतात कारण घराच्या मंदिराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा त्यात उल्लेख आहे आणि येथे कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत हे देखील सांगितले आहे.

भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की,  वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात पूर्वजांची किंवा पितरांचे फोटो लावू नयेत. असे केल्याने तुम्हाला देवतांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत देवाजवळ किंवा देवाशेजारी पूर्वजांचे फोटो मंदिरात ठेवल्यास ते अयोग्य ठरेल. (Pitrudosh Upay)

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024 :  नदी, घर, झाडं आणखी बरंच काही…! कुठे कुठे करू शकतो पितृपक्षात पिंडदान?

देवघरात पितरांचे फोटो का नकोत?

जगात देवतांचे स्थान उच्च आहे. त्यानंतर सर्व गोष्टींचा नंबर लागतो. तसेच, पितरांचे स्थान देवी-देवतांच्या खालचे आहे. अशा स्थितीत देवासोबत किंवा देवाशेजारी पूर्वजांचे फोटो लावणे अयोग्य ठरेल.

घरातील मंदिरात पूर्वजांचे फोटो ठेवले तर देव आणि पूर्वज समान आहेत. जे अनुचित असेल. जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवले तर पितृदोष देखील होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात.

देवाच्या मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढू शकते. आर्थिक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पितरांचे, पूर्वजांचे फोटो लावू नका.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.