पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी अनेक उपाय केले जातात. पितरांसाठी श्राद्ध अन् तर्पण केलं जातं. पितरांसाठी दान-धर्मही केला जातो. हिंदू धर्मात या विधींना महत्त्वाचे मानले जाते. कारण, या काही कार्यांनी आपल्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. पितृपक्षात पितर पृथ्वीतलावावर आलेले असतात. त्यामुळे, पितारंसाठी या काळात विधी केले जातात.
काही परिस्थितीत पितरांना तर्पण अर्पण करू न शकल्याने तुमचे मन अशांत राहते. अशा परिस्थितीत, इतर अनेक उपाय आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध करू शकता. श्राद्ध पक्ष हा पितरांचा सण आहे, या मान्यतेनुसार पितरांच्या नावाने तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
पण हे विधी खर्चिक असतात. पितरांसाठी लोक करतातही. पण, खरंच एखाद्याची परिस्थिती नसेल तर तो कसा या विधींवर खर्च करू शकतो. त्यामुळेच, शास्त्रात सांगितेल्या काही गोष्टी केल्यानेही पितृ शांत होतात. त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता आणि वाईट शक्तीही दूर होते. तसेच, तुमच्या प्रगतीतील अडथळेही दूर होतात.
पिंड दान किंवा तर्पण अर्पण करण्यासाठी पितृ पक्षाचा काळ सर्वोत्तम मानला जातो. पितृ पक्ष सुरू होताच, लोक आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तीर्थक्षेत्रे गया, हरिद्वार, काशी, ऋषिकेश आणि प्रयागराज येथे जावे लागते. तीर्थक्षेत्री श्राद्ध केल्याने पितर संतुष्ट होतात असा समज आहे.
मात्र आर्थिक अडचणींमुळे तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. काही खास पद्धतींचा अवलंब करून तुम्ही घरच्या घरी तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकता. अशा परिस्थितीत पैशाची कमतरता किंवा गरिबी असल्यास पितरांचे श्राद्ध कसे करावे ते जाणून घेऊया.
शास्त्रानुसार अन्न आणि वस्त्रासाठी पैशाची कमतरता असल्यास भाज्यांनी म्हणजेच हिरव्या भाज्यांनीही श्राद्ध करता येते. पण जर भाजी करूनही श्राद्ध करणे शक्य नसेल तर दक्षिणेकडे तोंड करून दोन्ही हात वर करून ही प्रार्थना करावी.
याचा अर्थ :- माझ्या पूर्वजांनो ! माझ्याकडे श्राद्धविधीसाठी योग्य पैसा किंवा धान्य नाही. पण मला तुमच्याबद्दल अपार आदर आणि भक्ती आहे. म्हणूनच मी तुम्हाला यातून संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. शास्त्रानुसार मी माझे दोन्ही हात आकाशात उंचावून तुझी प्रार्थना करीत आहे.
पंडित रमेश भोजराज त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध पक्ष हा सर्वोत्तम काळ मानला जातो. श्राद्धात उदबत्ती, तर्पण, पिंडदान आणि ब्राह्मणांना भोजन अर्पण करून पितरांना तृप्त केले जाते. पण तुम्ही श्राद्ध किंवा पितृदोषाला संतुष्ट करू शकत नाही. तर आणखी एक सोपा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता.
भागवत गीतेचे पठण करून पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते. गीतेचे ज्ञान जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रात दिले. या गीतेचा ७ वा अध्याय पितरांच्या मुक्ती आणि मोक्षाशी संबंधित आहे.
गीतेचा 7वा अध्याय श्राद्ध पक्षात पाठ केला जातो. या अध्यायाचे नाव आहे ज्ञान-विज्ञान योग. श्राद्धाच्या वेळी या अध्यायाचे जास्तीत जास्त पठण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे पितरांना समाधान मिळेल आणि पितृदोषापासून मुक्ती मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.