Pitru Paksha 2024 : 17 की 18 सप्टेंबर कधी होतेय पितृपक्षाची सुरूवात, जाणून घ्या संपूर्ण तिथी

Pitru Paksha Date Muhurta And Significance : पितरांसाठी केले जाणारे उपाय हे या 15 दिवसांत केले जातात. या दिवसात केलेले उपाय हे फलदायी ठरतात अशी मान्यता आहे.
Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024 esakal
Updated on

Pitru Paksha 2024 :

हिंदू महिन्यांमध्ये दोन महत्त्वाच्या घटना असतात: पौर्णिमा आणि अमावस्या होय. भाद्रपद महिन्यात येणारी पौर्णिमा विशेषत: भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृ पक्षाची सुरुवात होते.

हिंदू धर्मात पवित्र श्रावण महिन्याला जसे महत्त्वाचे स्थान आहे. तसे 15 दिवसांच्या पितृपक्षालाही महत्त्व आहे. या दिवसात पितरांची आठवण करून त्यांचे श्राद्ध, तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. (Pitru Dosh )

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचा संपूर्ण पंधरवाडा कोणते शुभ काम करू नका: फक्त मनोभावे पितृ पक्ष साजरा करा

पितृ पक्षाचे महत्त्व काय आहे?

आपल्या पिढ्यांमध्ये जर कोणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल. त्याचा त्रास आताच्या पिढीला पितृदोषाच्या रूपाने होत असेल. तर, हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपायही केले जातात. त्यापैकी एक म्हणजे पितरांची शांती करणे होय.

पितरांसाठी केले जाणारे उपाय हे या 15 दिवसांत केले जातात. या दिवसात केलेले उपाय हे फलदायी ठरतात अशी मान्यता आहे. त्यामुळेच, या दिवसात पितरांची शांती करण्याकडे लोकांचा कल असतो. (Pitru Paksha 2024)

Pitru Paksha 2024
MPSC Success: मातृ- पितृ छत्र हरपलेल्या ‘आनंद’ चे यश! आयोगाच्या सहायक गटविकास अधिकारी परीक्षेत राज्यात प्रथम

भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा कधी आहे?

 पौर्णिमा तिथी 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी सुरू होईल आणि 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीच्या प्रभावामुळे भाद्रपद पौर्णिमा 18 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल.

यंदा पितृपक्षाचा कालावधी काय आहे?

पंचांगानुसार, यावर्षी पितृ पक्षाची सुरूवात 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर, याची समाप्ती 2 ऑक्टोबर दिवशी होणार आहे.

Pitru Paksha 2024
गुरुकुल विद्यालयात मातृ पितृ कृतज्ञता दिन

वाराणसीतील पंडित शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, पितृ पक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे जीवनातील समस्यांपासून सुटका मिळते. असे मानले जाते की जर श्राद्ध केले नाही तर आत्म्याला पूर्ण मोक्ष प्राप्त होत नाही. पण, पितृपक्षात पितरांचे स्मरण केल्याने त्याचा फायदा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.