Pitru Paksha 2024 :  नदी, घर, झाडं आणखी बरंच काही…! कुठे कुठे करू शकतो पितृपक्षात पिंडदान?

पिंडदान हे केवळ नदी घाटावर करावे असे काही लोक सांगतात. पण, तसं नाही, तुम्ही इथेही करू शकता पिंडदान
Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024 esakal
Updated on

Pitru Paksha 2024 : 

हिंदू धर्मात पितृपक्षाला महत्त्व आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करावे लागते. पिंडदान केल्याने अतृप्त आत्मा होतो अशी समजूत आहे. त्यामुळेच, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे नैवेद्य ठेवले जातात. काही ठिकाणी तर त्या व्यक्तीसाठी नदी,स्मशानभूमीत आणि गायीलाही नैवेद्य भरवला जातो.

गाय अन् मुक्या प्राण्याच्या माध्यमातून संबंधित मृत व्यक्तीचा आत्माच नैवेद्य खाऊन तृत्प होईल, त्याला मोक्ष प्राप्त होईल, असा यामागचा हेतू असतो. काही कारणाने व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नसेल तर घराण्याला पितृदोष लागू शकतो. त्यामुळेच, पितृपक्षात पिंडदान केले जाते.

Pitru Paksha 2024
Pitru Paksha: पितृपक्षात पितरांसाठी खीर का बनवली जाते? जाणून घ्या कारण अन् रेसिपी

पिंडदान हे केवळ नदी घाटावर करावे असे काही लोक सांगतात. पण, तसं नाही. शास्त्रात अशी काही ठिकाणे सांगितली आहेत ज्या ठिकाणी पिंडदान केल्यानेही पितृदोषाचा त्रास नाहीसा होऊ शकतो. अशी कोणती ठिकाणे आहेत जाणून घेऊयात.

नदी घाटावर करावे पिंडदान

गरूड पुराणात असं सांगितलं गेलंय की, पिंडदानासाठी नदीघाटच योग्य ठिकाण आहे. नदी ही प्रवाही असते ती आपल्या पितरांपर्यंत आपल्या भावना पोहोचवते, त्यामुळेच नदीवर पिंडदान करण्याची प्रथा आहे. पाणवठा असलेल्या ठिकाणी म्हणजे नदी, समूद्र अशा ठिकाणीही पिंडदान केले जाते. 

घरातही होऊ शकते पिंडदान

जे लोक एखाद्या पवित्र स्थानी जाऊ शकत नाहीत. त्यांनी घरी पिंडदान केले तरी सुद्धा चालते. काही परिस्थितीत अशा ठिकाणी जाणं शक्य नसतं. किंवा घरातील सर्व लोक उपस्थित राहू शकतील असे बाहेर पडणे जमत नाही. तेव्हा, घरीही पिंडदान केले तरी चालते.

घरीच पिंडदान करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे, घरातील दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा आहे. त्यामुळे, पिंडदान करताना या गोष्टीची खास काळजी घ्यावी. 

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

या झाडाखालीही होऊ शकते पिंडदान

पितृपक्षात सर्वत्र पिंडदानाची गडबड सुरू असते. पश्चिम महाराष्ट्रात काही घरात पितरांचे म्हाळ पार पडतात. याला पितरांचे श्राद्ध असेही म्हटले जाते. तुम्ही हे पिंडदान वडाच्या झाडाखालीही करू शकता. फक्त झाडाखाली उभं राहण्याची किंवा बसण्याची दिशा दक्षिण असावी, याची काळजी घ्यावी. 

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024: पितृ पक्षाला सुरवात; श्राद्ध केल्यामुळे मिळतो माता-पिता, पूर्वजांचा आशीर्वाद

जंगलातही करू शकतो पिंडदान

घर, नदी घाट शक्य नसेल तर तुम्ही पितरांचे श्राद्ध, पिंडदान जंगलात जाऊनही करू शकता. घनदाट जंगलात जाऊन केलेले पिंडदान, श्राद्ध, तर्पण केल्याने आपले पूर्वज नाराज होतात.

Pitru Paksha 2024
Pitru Paksha 2024: पितृ पक्षाच्या 15 दिवसांमध्ये नकळत केलेल्या चुका पडू शकतात महागात, 'या' गोष्टींची घ्या काळजी

गोशाळेतही करू शकतो पिंडदान

धर्मग्रंथात उल्लेख आहे की जे लोक पवित्र नदी किंवा जंगलात पिंडदान देऊ शकत नाहीत. घराजवळील गोठ्यात बसून तो श्राद्धविधी करू शकतो किंवा पिंडदान करू शकतो. मात्र व्यक्तीचे तोंड दक्षिणाभिमुख असावे हे ध्यानात ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.