Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Unknown Facts About Pitrupaksha : मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याला पिंडाला स्पर्श करण्यापासून रोखतो,कारण...
During Pitru Paksha, crows are believed to be messengers from Yama
During Pitru Paksha, crows are believed to be messengers from Yamaesakal
Updated on

Unknown Facts About Pitrupaksha :

पितृपक्षात श्राद्ध, पिंडदान, पितृदोष शांति केली जाते. हा पंधरा दिवसांचा काळ आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी महत्त्वाच्या मानला जातो. कारण या काळात आपले पूर्वज जमिनीवरती आलेले असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात असे म्हटले जाते.

पितृपक्षात पिंडदान, पितृशांती यांना महत्त्वाचे स्थान आहे. कारण पिंडदान केल्याने इतरांच्या मनाला शांती मिळते आणि आपल्या जीवनातील अडचणी अडथळे दूर होतात अशी समजूत आहे. पितृ पक्षात केल्या जाणाऱ्या पिंडदानाला काय आहे महत्त्व

During Pitru Paksha, crows are believed to be messengers from Yama
Pitru Paksha: ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे! पितृपक्षातच कावळ्यांचे स्मरण, पक्षीमित्रांची खंत

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा पिंडदान केले जाते.  पिंडदान केल्यानंतर या पिंडाला कावळा जर शिवला तर मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली असे म्हटले जाते. एखादी व्यक्ती काहीतरी इच्छा अपेक्षा ठेवून मरतो तेव्हा त्याचा आत्मा भटकत राहतो.

त्याला स्वर्गात जाण्यासाठी कावळा मार्ग दाखवतो, अशी समजूत आहे. कावळ्याने पिंड शिवले की मृत व्यक्तीचा आत्मा पुढील प्रवासासाठी निघतो असे म्हणतात. त्यामुळे पितृ पक्षात पिंडदान करण्याचे महत्त्व आहे.

हिंदू धर्मात यमराज हे आपली मृत्यूची वेळ निश्चित करतात. व्यक्तीला त्याच्या पाप-पुण्यातून मुक्त करून मृत्यूकडे घेऊन जाणारे देवता म्हणजेच यमदेवता. यमराज यांना मृत्यूचा देव मानला जातो. एखाद्या व्यक्तीसाठी केलेले पिंडदान स्पर्श करून कावळा त्या व्यक्तीचे मार्ग मोकळे करतो.

During Pitru Paksha, crows are believed to be messengers from Yama
Nashik News: झेंडूच्या फुलांना भाव! शेतकऱ्यांत समाधान; पितृपक्षात 100 रुपये किलो दराने विक्री

कावळा यमराजच असल्याचे मानले जाते. म्हणजे व्यक्तीला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी यमराज स्वतः कावळ्याचे रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि व्यक्तीला मोक्ष मिळवून देतात अशी मान्यता हिंदू धर्मांच्या पुराणांमध्ये सुद्धा आहे.

एका पौराणिक कथेनुसार, यमराजांनी कावळ्याला वरदान दिले आहे. ते म्हणतात की जेव्हा कावळ्याचे पोट भरेल कावळा तृप्त होईल तेव्हा पृथ्वीवरील कुठलाही व्यक्ती मेल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होईल. त्यामुळेच पितृपक्षात आपल्याला कावळे अधिक घरावर आलेल्या दिसतात.

याबद्दल आहे ही पौराणिक कथा

एकदा राजा मरुतने यज्ञ करण्याचे योजिले होते. त्याने या यज्ञाला सर्व देवांनाही आमंत्रण दिले होते. यावेळी, लंकाधिपती रावण हा यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी चालून आला. तेव्हा इंद्र देवाने मोराचे, वरुणाने हंसाचे तर यमराजाने कावळ्याचे रूप धारण केले. दरम्यान, राजा मरुतने रावणाशी लढण्यासाठी म्यानातून तलवार काढली, परंतु ऋषी म्हणाले, 'राजा, तू यज्ञ सुरू केला आहेस. यज्ञाच्या वेळी पाप केले तर तुमचा वंश वाढणार नाही.

During Pitru Paksha, crows are believed to be messengers from Yama
Nashik : पाऊस, पितृपक्षामुळे सर्वच भाज्यांचे दर तेजीत

तुम्हाला महादेवांचा कोप सहन करावा लागेल. हे ऐकून राजा मरुत काही करू शकला नाही. जेव्हा रावण दृष्टीआड झाला तेव्हा इंद्र, वरुण आणि यम त्यांच्या मूळ रूपात परतले. या कथेत रावण विजयी झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषित केले असे सांगितले आहे.

यानंतर सर्व देवांनी मूळ रूपात परतून प्रत्येक पक्षाला एक वरदान दिले. यमराजांनी कावळ्याला मृत्यूच्या भीतीतून मुक्त केले. कावळ्याचे पोट भरल्यावरच यमलोकातील आत्मे तृप्त होतील आणि ते तृप्त होतील, असा आशीर्वादही दिला. म्हणूनच कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे असेही मानले जाते.

पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन पितरांना तृप्त करतात. यमराज आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत कावळ्याच्या शरीराला स्पर्श करू देत नाहीत, असेही म्हटले जाते. असे मानले जाते की मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येते आणि शरीराला स्पर्श करते.

During Pitru Paksha, crows are believed to be messengers from Yama
Dhule Agriculture News : कोथिंबीर 150 रुपये प्रतिकिलो...! पितृपक्षामुळे किरकोळ विक्रीचे भाव कडाडले

प्रत्यक्षात मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याला पिंडदानाला स्पर्श करण्यापासून रोखतो, जोवर मृत व्यक्ती जोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे वचन घेत नाही, तोवर कावळ्याला व्यक्तीचा आत्मा पिंडाला स्पर्श करू देत नाही.

कावळा आहे द्वारपाल

कावळ्याच्या व्यक्तीच्या आत्म्याचे दर्शन होण्यासाठीची विशेष दृष्टीही असते. कावळ्याचा जन्म वैवस्वत कुळात झाला आहे. कावळा यमराजाचा द्वारपाल आहे. त्यामुळे पिंडाला स्पर्श केल्यास मृत व्यक्ती यमद्वारीत प्रवेश करतो असे म्हणतात. त्यामुळे, मृत व्यक्तीच्या अपूर्ण इच्छा कावळ्याला सांगून पूर्ण केल्या जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.