या धावपळीच्या जीवनात स्वतःला आनंदी ठेवणे खूप महत्वाचे आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत घरच्या आणि ऑफिसच्या कामामुळे कंटाळा येतो. जर तुम्ही एप्रिल महिन्यात तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत काही निवांत वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर भारतातील काही अद्भुत ठिकाणांना भेट देऊ शकता.
गोवा
गोवा हे पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध स्थळ आहे. येथे देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्यने भेट देण्यास येतात. गोवा एप्रिल महिन्यात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. गोव्यातील शांत समुद्रकिनाऱ्यांवर वेळ घालवू शकता. सीफुड प्रेमी असाल तर गोवन सी फुडचा देखील आस्वाद घेऊ शकता.
दार्जिलिंग
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे देखील मौजमजा करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. उंच टेकड्यांनी वेढलेल्या दार्जिलिंगमध्ये तुम्ही बटासिया गार्डन, कांचनजंगा व्ह्यू पॉइंट, तेनझिंग रॉकला भेट देऊ शकता. टॉय ट्रेनचा प्रवासही इथला प्रसिद्ध आहे.
अंदमान
अंदमानचे हॅवलॉक बेट देखील एप्रिल महिन्यात भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. समुद्रकिनारी प्रेमींसाठी हे स्वर्गापेक्षा कमी नाही. गोंधळ नाही आणि प्रदूषण नाही. तुम्ही येथे मजा करू शकता आणि आनंद घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबासह अद्भुत क्षण घालवू शकता.
जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूर देखील भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या गुलाबी शहरात तुम्ही वेगवेगळे पदार्थ आणि सणांचा आनंद घेऊ शकता. जो केवळ देशातच नाही तर परदेशी पर्यटकांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. येथील राजेशाही जेवण सर्वांनाच आवडते. तुम्ही इथेही जाऊन तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा पालकांसोबत सुट्टीचा आनंद घेऊ शकता.
राजस्थान
राजस्थानचे रणथंबोर हे वन्यजीवप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासह, कुटुंबासह, मित्रांसोबत खूप मजा करू शकता. मार्च-एप्रिल हे महिने सर्वोत्तम मानले जातात कारण या महिन्यात रणथंबोरच्या व्याघ्र अभयारण्यात रॉयल बंगाल टायगर्स दिसण्याची शक्यता वाढते, जे पर्यटकांना भरपूर आकर्षित करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.