Plant Based Foods : व्हिगन असलेले पदार्थ जसे की कडधान्य, फळ, मशरूम, पालेभाज्या यांचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पण त्यांचा केवळ तेवढाच फायदा नाही तर, ते आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. हे आपले हृदय, रक्त आणि आवश्यक अवयव निरोगी ठेवण्यास मदत करते.
ज्या पदार्थांचा वापर पुन्हा निर्मिती करण्यासाठी होतो. त्यांचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. आहारतज्ञ असे सांगतात की, मांसाहारापेक्षा वनस्पतीजन्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. नवीन संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे की, ज्या रुग्णांनी व्हिगन आहाराचा अधिक सेवन केले, ते लवकर बरे झाले आणि त्यांच्या शरीरात आश्चर्यकारक सकारात्मक बदल झाले.
व्हिगन आहाराचे अनेक प्रकार आहेत, जसे की शाकाहारी, कच्चे पदार्थ, फळ, मोड आलेले पदार्थ इत्यादी होय. जर तुम्ही तुमच्या आहारात अधिकाधिक वनस्पतीजन्य अन्नाचा समावेश केला तर ते तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर सहज मात करण्यास आणि अधिकाधिक निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. जाणून घेऊया त्याचे फायदे.
रक्तदाब कमी होतो
एव्हरीडेहेल्थनुसार, जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात व्हिगन पदार्थांचे सेवन वाढवावे. संशोधनात असे आढळून आले आहे की असे केल्याने तुमचा रक्तदाब कमी होईल आणि तुमचा मधुमेह टाइप २, स्ट्रोक, हृदयविकार इत्यादींपासून बचाव होईल.
हृदय निरोगी राहते
मांसामध्ये अधिक संतृप्त चरबी असते, जी हृदयाच्या समस्या वाढवण्याचे काम करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये हे प्रकाशित करण्यात आले आहे की जर आपण व्हिगन आहार घेतो, तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो.
मधुमेहापासून बचाव होतो
वजन वाढणे हे मधुमेह टाइप टूच्या समस्येचे प्रमुख कारण मानले जाते. पण जेव्हा आपण आहारात अधिक व्हिगन ोष्टींचा समावेश करतो, तेव्हा वजन वाढण्याची शक्यता निम्मी होते आणि आपण मधुमेहासारखे गंभीर आजारही टाळतो.
वय वाढते
संशोधनात असे आढळून आले आहे की अधिक व्हिगन अन्न सेवन केल्याने वय 25 टक्क्यांनी वाढू शकते. इतकंच नाही, तर तुम्ही हेल्दी प्लांट फूड खाल्ल्यास तुमची संरक्षणात्मक पातळीही वाढते.
कॅन्सरचा धोका कमी करा
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चने एका रिसर्चमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला कॅन्सरपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, भाज्या, फळे, धान्ये, बीन्स, नट, बिया इ. तुमच्या आहारात समाविष्ट करा. इतकेच नाही तर कर्करोगापासून वाचलेल्या व्यक्तींनीही निरोगी व्हिगन अन्न सेवन केले तर त्यांचे आरोग्य १० टक्क्यांनी वाढू शकते.
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते
याच्या सेवनाने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे तुमचे अनेक अवयव चांगले काम करतात आणि तुमचे हृदय निरोगी राहते. त्यामुळे पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. अल्झायमरसारख्या मेंदूशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी वनस्पती अन्न देखील मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.