PM Narendra Modi Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात मोदींच्या जॅकेटची चर्चा, 'हे' आहे खास कारण

PM Narendra Modi: मोदी सरकारचा शपथविधी सोहळा राष्ट्रपतीभवनात पार पडला असून मोदींनी या सोहळ्यात निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.
PM Narendra Modi Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात मोदींच्या जॅकेटची चर्चा, 'हे' आहे खास कारण
Updated on

PM Narendra Modi Oath Ceremony: मोदी सरकार ३.० चा शपथविधी सोहळा ९ जूनला संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात मोठ्या उत्साहात पार पडला. यासह देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या सोहळ्यात त्यांनी घातलेल्या जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधले होते.

त्यांच्यासोबत अनेक कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे पीएम मोदी प्रत्येक कार्यक्रमात खास ड्रेसमध्ये दिसतात. शपथविधी सोहळ्यात त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्तासोबत चुरीदार पायजमा आणि निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. तसेच काळ्या रंगाच्या शूजसह त्यांनी लूक पुर्ण केला होता. पंतप्रधान मोदींच्या या लूकने सर्वाचे लक्ष वेधले होते.

पीएम मोदी नेहमी खास प्रकराचे जॅकेट घालतात, तसेच त्यांचे जॅकेट 'मोदी जॅकेट' नावाने प्रसिद्ध झाले आहे. मोदींचे सर्व जॅकेट्स खास अहमदाबादमध्ये शिवले जातात. निळा रंग हा स्थिरता, ज्ञान, आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिकचे प्रतिक मानला जातो. हा रंग भावना, ज्ञान आणि संवेदनशीलता दर्शवतो. निळा रंग मनाला शांती आणि संतुलन प्रदान करणारा मानला जातो. तसेच हे सामर्थ्य आणि शांतता दर्शवते.

तर २०१९ मध्ये भव्य शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि चुरीदार पायजमा घातला होता. तसेच त्यावर राखाडी रंगचाे जॅकेट घातले होते.

तसेच २०१४ मध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींनी क्रिम रंगाचा कुर्ता आणि चुरीदार पायजमा घातला होता. त्यासोबत त्यांनी भुरकट रंगाटे फाफ स्वीव्हज जॅकेट घातले होते. ज्यामध्ये त्ंयांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांनी काळ्या रंगाच्या शूजसह हा लूक पुर्ण केला होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com